नागपूर Devendra Fadnavis Criticized MVA : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (23 एप्रिल) हनुमान जयंतीनिमित्त नागपुरातील गवळीपुरा येथील हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना फडणवीसांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं. तसंच हनुमंताचं दर्शन घेतल्यानंतर उपस्थित पत्रकारांनी त्यांना काय साकडं घातलं? असा प्रश्न विचारला असता त्यावर, “हनुमान जयंतीच्या पर्वावर नागपुरातील प्रसिद्ध टेकडी लाइन हनुमान मंदिरात दर्शन घेतलं. बजरंग बली बुद्धी, शक्ती देतात. त्यामुळं त्यांच्याकडं आमच्याकरीता बुद्धी आणि विरोधकांकरीता सूबुद्धी मागितली”, असं फडणवीस म्हणाले.
शरद पवारांच्या टीकेला दिलं प्रत्युत्तर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना मोदींशी केली होती. यावर प्रतिक्रिया देत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "शरद पवार असो वा अन्य कुठलाही विरोधक, त्यांना आता समोर त्यांचा पराभव दिसू लागलाय. पराभवाच्या हताशेनं ते शिवीगाळीवर उतरलेत. मात्र, मोदींना जेव्हा-जेव्हा शिव्या पडतात, तेव्हा-तेव्हा विजय भव्य असतो. हे जेवढ्या शिव्या देणार, तेवढं लोकं मोदींवर जास्त प्रेम करणार.”