महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

कसबा पॅटर्न यंदाच्या लोकसभेत काम करेल का? घ्या जाणून - Loksabha Elections - LOKSABHA ELECTIONS

Loksabha Elections : पुढील महिन्यात देशभरात लोकसभा निवडणूक होणार आहे. यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केलीय. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होणार असून पुण्यात भाजपा विरुद्ध काँग्रेस अशा लढतीचं चिन्ह आहे. भारतीय जनता पक्षाकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर काँग्रेसकडून अजूनही कुणालाच उमेदवारी देण्यात आलेली नाही. असं असताना मागच्या वर्षी झालेल्या कसबा पोटनिवडणुकीत वापरण्यात आलेलं 'कसबा पॅटर्न' (Kasba Voting Patter ) यंदाच्या या लोकसभा निवडणुकीत देखील काम करणार का?, की भारतीय जनता पक्ष आपली जादू दाखवणार हे पाहूयात.

Loksabha Elections
लोकसभा निवडणूक

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 21, 2024, 5:43 PM IST

Updated : Mar 21, 2024, 8:03 PM IST

प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर बिजले

पुणे Loksabha Elections: मागच्या वर्षी पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघात पोटनिवडणूक झाली आणि या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे विजयी झाले होते. यावेळी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी म्हणजेच महाविकास आघाडीकडून जी एकजूट दाखवली आणि कसबा पोटनिवडणुकीत भाजपाच्याच बालेकिल्ल्यात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला हरविण्यात आलं. ते पाहता महाविकास आघाडीच्या 'कसबा पॅटर्न'ची (Kasba Voting Patter) चर्चा राज्यात नव्हे तर देशभरात होऊ लागली. पाहता पाहता देशात विरोधकांची इंडिया आघाडी देखील झाल्याचं पाहायला मिळालं.


कसबा पॅटन कसा झाला: कसबा पोटनिवडणुकीच्या काळात काँग्रेस पक्षात जरी अंतर्गत गटबाजी असली तरी, विरोधकांची ईडी, सीबीआयची सुरू असलेली चौकशी, सोनिया गांधी यांनाच ईडी कार्यालयात वारंवार बोलावणं तसंच त्याकाळात शिवसेना फुटीनंतर पक्षाचं चिन्ह आणि नाव एकनाथ शिंदे यांना जाणं आणि भाजपाकडून अजित पवार यांना टार्गेट करणं. तेव्हा अजित पवार यांचा रोड शो हे सगळं कसबा पोटनिवडणुकीवेळी जुळून आलंय. तसंच आक्रमक विरोधक एकत्र आले आणि एकजूट होऊन कसबा पॅटर्न तयार झाला.



पुन्हा कसबा पॅटन होऊ शकतो का...?: पुढील महिन्यात देशभरात लोकसभा निवडणूक होणार आहे. या वर्षभरात देशासह राज्यात खूप काही राजकीय समीकरणं बदललेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. कसबा पॅटर्नच्या वेळेस महाविकास आघाडीसोबत अजित पवार हे होते. तसंच शिवसेनेचं चिन्ह आणि नाव हे देखील त्यावेळेस एकनाथ शिंदे यांना गेल्यानं ते देखील आक्रमक झाले होते. तसंच महत्त्वाची बाब म्हणजे निवडणुकीत काँग्रेसची अंतर्गत वाद विसरून एक दिलानं काम केलं होतं. पण आत्ताच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षात काही इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी देखील पाहायला मिळत आहे. म्हणूनच यंदाच्या या निवडणुकीत राज्यात काही ठिकाणी कसबा पॅटर्न जरी काम करत असला तरी, पुण्यात मात्र काम करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पुण्याचे भाजपाचे 5 आमदार : याबाबत राजकीय विश्लेषक ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर बिजले म्हणाले की, कसबा पोटनिवडणुकीच्या वेळेस विरोधकांनी एकजूट दाखवली होती. तसंच भारतीय जनता पक्षानं देखील काम केलं होतं. पण धंगेकर यांची जनतेच्या मनातील कार्यकर्ता ही जी प्रतिमा होती ती देखील महत्त्वाची होती. कसबा पोटनिवडणुकीच्या वेळेस विरोधकांचा कसबा पॅटर्न चालणार का? तर अनेक प्रश्न यासाठी उपस्थित होत आहेत. अजित पवार यांचा गट आता फुटून वेगळा झाला आहे. तसंच कसबामध्ये धंगेकर हे अनेकवेळा नगरसेवक असल्यानं त्यांचे हक्काचे मतदार देखील आहेत. आता तो फायदा 5 मतदार संघात होणार का? हे पाहावं लागणार आहे. भाजपाचे आज पुणे शहरात 5 आमदार आहेत. हे आमदार देखील आपली प्रतिष्ठा पणाला लावणार आहेत.

भाजपाच्या अंतर्गत गटबाजीचा फटका: पुणे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 'कसबा पॅटर्न' वापरण्याचा पूर्णपणे विचार करतील. पण त्याचं रूपांतर विजयात होईल का? हे सांगणं खूपच मुश्किल आहे.आज देशासह राज्यात आपण पाहिलं तर महाविकास आघाडी सध्या तरी एकसंघ वाटत आहे. पुणे शहरात काँग्रेस पक्षात जरी अंतर्गत गटबाजी असली तरी, एकसंघ मतदार पुणे कँटोन्मेंट, कसबा आणि शिवाजीनगर मतदार संघात पाहायला मिळतेय. म्हणून अंतर्गत गटबाजीचा काहीही परिणाम दिसणार नाही. तसंच शिवसेनेचे मूळ शिवसैनिक हे आजही उद्धव ठाकरे यांच्या सोबत पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ही अन्य पक्षाच्या तुलनेत कमी असल्यानं अजित पवार यांच्यासोबत गेल्याचा फटका महाविकास आघाडी सरकारला बसण्याची शक्यता आहे. तसंच दुसरीकडं भारतीय जनता पक्षात देखील अंतर्गत गटबाजी ही समोर आलेली आहे. कसबा पोटनिवडणुकीत भाजपाला भाजपाच्या अंतर्गत गटबाजीचा फटका हा बसला होता. तसाच फटका पुणे लोकसभेमध्ये बसण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं देखील यावेळी बिजले म्हणाले.

लोकसभेत कितपत फायदा होणार: एकूणच सध्या देशातील तसंच राज्यातील परिस्थिती पाहिली तर विरोधक हे एकवटले आहेत. तर दुसरीकडं भाजपा देखील आपल्या घटक पक्षांना सोबत घेत आहेत. आता पुण्यातील 'कसबा पॅटर्नचा' फायदा पुणे लोकसभेत कितपत होईल हे पुढील काळात स्पष्ट होईल.

हेही वाचा -

  1. संजय राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावरुन भाजपाची ठाकरे गटावर घणाघाती टीका, म्हणाले... - BJP on Sanjay Raut
  2. Lok Sabha Elections 2024: महाविकास आघाडीची बैठक संपली, अनंत गीते शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल
  3. PM Narendra Modi: 'त्यांनी मला 104 वेळा अपशब्द वापरले, पण...'; संजय राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर पंतप्रधान मोदींचं प्रत्युत्तर - Lok Sabha Elections 2024
Last Updated : Mar 21, 2024, 8:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details