मुंबई Konkan Graduate Constituency : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता सर्वांचं लक्ष आगामी कोकण पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांकडे लागलंय. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवणुकीत एकत्रित लढत मोठ्या प्रमाणात यश संपादन केलेल्या महाविकास आघाडीत दोन गट पडल्याचं दिसून येतंय.
कॉंग्रेसनंतर उद्धव ठाकरेंनी दिला उमेदवार : कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपा कडून निरंजन डावखरे आणि काँग्रेस कडून रमेश कीर यांनी यापुर्वीच अर्ज दाखल केलाय. मनसेच्या अभिजीत पानसे यांनी माघार घेतलीय. त्यातच उद्धव ठाकरेंनी किशोर जैन यांना उमेदवारी जाहीर केल्यानं ही निवडणूक आता रंगतदार होणार अशी चिन्हं आहेत. रायगडमधील नागोठण्याचे किशोर जैन ह्यांच्या शिक्षणसंस्था असून ते व्यावसायिक आहेत. ते ठाकरे कुटूंबीयांचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जातात. रायगड जिल्हा परीषद सदस्य असलेले जैन हे आता पाच जिल्ह्यांत पसरलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या लढाईत उतरत असून आज त्यांनी बेलापूर येथील कोकण भवन इथं आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. एकीकडं महाविकास आघाडी इतर जागा एकत्र लढत आहे. तर कोकण पदवीधर मतदारसंघात मविआकडून आघाडी धर्म पाळला जात नसल्याचं दिसतंय.