पुणे: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. वेगवेगळ्या पक्षांनी, उमेदवारांनी राज्यभर जोरदार प्रचार सुरू केला आहे. तसंच राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. तर दुसरीकडं आज महायुतीचे घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या राज्यभरातील 50 हून अधिक पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत महायुतीला मतदान करणार नसल्याची शपथ घेतली. रिपब्लिकन पक्षाचे नेते माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे आणि आरपीआयचे 50 पेक्षा अधिक पदाधिकारी यांनी आज पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे एकत्र येत ही शपथ घेतली.
आमचे मत निळ्या झेंड्याला :राजकारणात सन्मानपूर्वक वागणूक न देणाऱ्या महायुतीला मतदान न करण्याची आमची भूमिका कायम आहे.आमचं मत हे आंबेडकरी जनतेचं मत असून ते निळ्या झेंड्यालाच असणार आहे. आम्ही आमच्या रिपब्लिकन पक्षाचा देखील राजीनामा दिला आहे आणि या विधानसभा निवडणुकीत आम्ही महायुतीला मतदान करणार नाही.
प्रतिक्रिया देताना माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे (ETV Bharat Reporter)
2014 पासून महायुतीसोबत : यावेळी माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे म्हणाले, "आज राज्यभरातील आंबेडकरी चळवळीतील लोकांच्या मनातील जी खंत होती ती आज शपथद्वारे आम्ही मांडली. आम्ही 2014 पासून महायुतीसोबत होतो आणि त्यांनी जे काही आम्हाला शब्द दिले होते ते पाळले नाहीत. आम्ही जरी छोटे असलो तरी आमची मतेही निर्णायक आहेत आणि म्हणूनच आज आम्ही जाहीररीत्या शपथ घेत महायुतीचं काम करणार नसल्याचं सांगत आहोत".
पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला : आंबेडकर विचारांच्या प्रत्येकाने आता महायुतीला मतदान करायचं नाही असा निर्धार करा. अपमान सहन करून राजकारणात राहणे शक्य नाही, तो डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा अपमान ठरेल असं यावेळी आयुब शेख म्हणाले.
हेही वाचा -
- शरद पवार यांचे संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत, अजित पवारांबाबत म्हणाले, "बारामतीत.."
- शिट्टी चिन्ह बहुजन विकास आघाडीला मिळण्याचा मार्ग मोकळा, निवडणूक आयोगातर्फे उच्च न्यायालयात माहिती
- रेल्वेतील हिंदी भाषक टीसीनं मराठी प्रवाशाकडूनच मराठीची मागणी न करण्यासाठी घेतला लिखित माफीनामा; नंतर झालं असं काही...