महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

मी कोणाच्या नादी लागत नाही आणि कोणी माझ्या नादी लागलं तर...; श्याम मानव यांच्या आरोपानंतर देवेंद्र फडणवीस यांचा चढला पारा - Devendra Fadnavis On Shyam Manav - DEVENDRA FADNAVIS ON SHYAM MANAV

Devendra Fadnavis On Shyam Manav : ठाकरे कुटुंबाला अडकवण्याचा डाव उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आखल्याचा मोठा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी केला. या आरोपाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तर दिलं आहे.

Devendra Fadnavis
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 24, 2024, 7:43 PM IST

मुंबई Devendra Fadnavis On Shyam Manav: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव (Shyam Manav) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप लावले आहेत. या आरोपांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी उत्तर दिलं आहे. दुर्दैवानं सुपारीबाज लोकांच्या नादी श्याम मानव लागले असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे माझ्याकडं याबाबत सर्व पुरावे असून योग्य वेळी ते मी उघड करीन. कारण मी कोणाच्या नादी लागत नाही आणि कोणी माझ्या नादी लागलं तर त्याला सोडत नाही, असं रोखठोक उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (ETV BHARAT Reporter)



दुर्दैवाने श्याम मानव सुपारीबाज लोकांच्या नादी :देवेंद्र फडणवीस म्हणाले की, श्याम मानव बरीच वर्ष मला ओळखतात. त्यामुळं त्यांनी पहिल्यांदा अशा पद्धतीचे आरोप करण्यापूर्वी मला विचारायला हवं होतं. परंतु दुर्दैवाने मला असं वाटतं की, इकोसिस्टीममध्ये अलीकडच्या काळात सुपारीबाज लोक घुसलेले आहेत. दुर्दैवाने त्यांच्या नादी श्याम मानव लागले का? असा प्रश्न मला पडला आहे. परंतु एक गोष्ट मला स्पष्टपणे सांगायची आहे. अनिल देशमुख यांच्यावर आरोप लागल्यानंतर आमचं सरकार नव्हतं. श्याम मानव हे सातत्याने आरोप करत आहेत तरी मी शांत आहे, कारण मी अशा पद्धतीचं राजकारण करत नाही.



पुराव्याशिवाय मी बोलत नाही : फडणवीस पुढे म्हणाले की, माझा एक सिद्धांत पक्का आहे, मी कुणाच्या नादी लागत नाही आणि कोणी नादी लागलं तर सोडत नाही. त्या काळातल्या त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी त्यांचे काही ऑडिओ व्हिज्युअल्स मला आणून दिले आहेत. त्यामध्ये ते उद्धव ठाकरेंबद्दल काय बोलत आहेत. ते पवार यांच्याविषयी काय बोलत आहेत, वाझेबद्दल ते काय बोलत आहेत. आमच्यावर जे आरोप लावले आहेत, त्याबद्दल ते काय बोलत आहेत. या सर्व गोष्टी माझ्याकडे आहेत. माझ्यावर जर वेळ आली तर मला त्या पब्लिक कराव्या लागतील. मी अशा प्रकारचं राजकारण कधी करत नाही. पण जर का रोज कोणी खोटे बोलून या ठिकाणी नरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न करत असतील, तर त्यांनी इतकं लक्षात ठेवावं की, देवेंद्र फडणवीस पुराव्याशिवाय कधीच बोलत नाही.


अनिल देशमुख यांनी दबाव टाकला : महाविकास आघाडीने गिरीश महाजन यांच्यावर लावलेल्या खोट्या आरोपाबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सीबीआयने जी चार्जशीट दाखल केली आहे, त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की, गिरीश महाजन यांच्यावर मोक्का लागला पाहिजे. त्यांच्यावर खोट्या केसेस लागल्या पाहिजेत याकरता वारंवार गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख यांनी त्या ठिकाणी दबाव टाकला आणि गुन्हे दाखल करायला लावले. यामध्ये ऑडिओ व्हिज्युअल पुरावे मी स्वतः दिले होते आणि त्याच्यावरच सीबीआयकडे केस झाली. त्या केसमध्ये सीबीआयने पुराव्यासहित कोर्टामध्ये चार्जशीट दाखल केली आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कशाप्रकारे विरोधी पक्षाच्या आमदारांना मोक्का लावणे, खोट्या केसेस लावणे, खोट्या केसेसमध्ये फसवणे याची मोडस ऑपरेंडी होती हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे.


वॉरंटशी माझा काही संबंध नाही :मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेल्या नॉन बेलेबल वॉरंटवरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत. त्या विषयावर बोलताना ते म्हणाले की, मनोज जरांगे यांची केस ही २०१३ ची आहे. यापूर्वीसुद्धा या केसमध्ये त्यांचा नॉन बेलेबल वॉरंट निघाला आहे. तो त्यांनी रद्द केला. कुठल्याही क्रिमिनल केसमध्ये तुम्ही तारखेला हजर राहिला नाहीत तर नॉनबेलेबल वॉरंट निघतो. तुम्ही तारखेला हजर राहिलात तर तो रद्द होतो. म्हणून मागच्यावेळीसुद्धा त्यांचा असाच वॉरंट निघाला तो त्यांनी रद्द केला. आता पुन्हा ते तारखेला गेले नाहीत म्हणून वॉरंट निघाला आहे. ते तारखेला गेले तर न्यायाधीश तो वॉरंट रद्द करतील. त्याच्याशी आमचा कुणाचा काहीही संबंध नाही आहे. यापूर्वीही आमच्यावर असे अनेक वॉरंट निघाले आहेत. आमच्यावर अनेक केसेस आहेत. त्या त्या त्यावेळी आम्ही गेलो नाही तेव्हा अशा पद्धतीचे वॉरंट निघाले. आम्ही हजर झालो वॉरंट रद्द झाले. मी काही त्यांना दोष देणार नाही मागच्या वेळी उपोषणाच्या शेवटी ते माझ्या आईबद्दल बोलले होते. परंतु नंतर त्यांनी माफी मागितली आणि सांगितलं की उपोषणाच्यावेळी माझ्या डोक्यावर थोडा परिणाम झाला होता. मला त्रास झाला होता म्हणून मी रागाच्या भरात बोलून गेलो. आता उपोषणामुळं पुन्हा त्यांचा संताप झाला आणि ते या संदर्भात बोलले हे आपण समजू शकतो, असंही फडणवीस म्हणाले.



इकोसिस्टीम कोण चालवत आहे :देवेंद्र फडणवीस यांना वारंवार टार्गेट केलं जात आहे. या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट कोण करेल. यामुळं कोणाला फायदा आहे. फक्त आणि फक्त एकच टार्गेट देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस यांची जी काही शक्ती आहे, लोकांचे प्रेम आहे हे कोणाला समजतं तर कोणाला ते घातक वाटतं. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळं कोणाला धोका आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. म्हणून इकोसिस्टीम कोण चालवत आहे? हे सुद्धा आपण सर्वांना माहीत आहे.

हेही वाचा -

  1. "शरद पवारांनी मराठा समाजाला आरक्षण का दिलं नाही? वाजपेयी, मोदींमुळं आरक्षण..."- देवेंद्र फडणवीस - Devendra Fadnavis
  2. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीनं अटक करा; 'ठोकून काढा' वक्तव्यावर संजय राऊतांचा हल्लाबोल - Raut Demand Arrest To Fadnavis
  3. मुख्यमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच; राजकीय चर्चांना उधाण - Future CM Controversy

ABOUT THE AUTHOR

...view details