नागपूर Devendra Fadanvis On Anil Deshmukh : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यातील वाद उफाळून आलाय. "न्यायमुर्ती चांदीवाल चौकशी अहवाल हा महाविकास आघाडीच्या कार्यकाळात आला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला दावा हा खरा आहे. मात्र, काही दिवसातच आमचं सरकार कोसळलं. त्यामुळे चांदीवाल चौकशी अहवाल आमचं सरकार जाहीर करू शकलं नाही." असं स्पष्टीकरण अनिल देशमुख यांनी दिलं. दरम्यान आज अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा नवे आरोप केले. "देवेंद्र फडणवीस जेव्हा विरोधी पक्षनेते होते तेव्हा मला बदनाम करण्यासाठी त्यांनी परमबीर सिंह यांच्याशी डील केलं." असा आरोप अनिल देशमुख यांनी केलाय. त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी एका ओळीत आपलं उत्तर दिलं.
अनिल देशमुखांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात विषय संपवला, म्हणाले.." झूठ बोले..." - Devendra Fadanvis On Anil Deshmukh - DEVENDRA FADANVIS ON ANIL DESHMUKH
Devendra Fadanvis On Anil Deshmukh : देवेंद्र फडणवीस हे जेव्हा विरोधी पक्षनेते होते तेव्हा मला बदनाम करण्यासाठी त्यांनी परमबीर सिंह यांच्याशी डील केलं, असा आरोप अनिल देशमुख यांनी केला. त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी एका वाक्यात आपली प्रतिक्रिया दिली.
अनिल देशमुख, देवेंद्र फडणवीस (Source - ETV Bharat)
Published : Aug 5, 2024, 10:39 PM IST
चांदिवाल आयोगाचा अहवाल जाहीर करा :"राज्यात दोन वर्षांपासून महायुतीचं सरकार आहे. मग चांदिवाल आयोगाचा अहवाल प्रलंबित कां ठेवला आहे. देवेंद्र फडणविसांनी याचं उत्तर द्यायला हवं. निवृत्त न्यायाधीश चांदिवाल यांचा चौदाशे पानांचा अहवाल अद्याप पडून आहे. तो जनतेसमोर कां आणत नाही? त्यांनी तो आणावा ही माझी विनंती आहे." असं अनिल देशमुख म्हणाले.
- परमवीर सिंग-देवेंद्र फडणवीस यांच्यात डील :"परमवीर सिंग यांचे देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत एक डील झाली होती. देवेंद्र फडणवीस यांच्याचं आदेशाने परमवीर सिंग यांनी माझ्यावर आरोप केले." असंही अनिल देशमुख म्हणाले.
- परमवीर सिंग मास्तर माईंड : "मी गृहमंत्री असताना उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवण्यात आला होता. त्यासाठी ज्याचे वाहन वापरले त्या मनसुख हिरेन यांची हत्या, या दोन्ही प्रकरणात परमबीर सिंह जे तेव्हाचे मुंबई पोलिसांचे आयुक्त होते, तेच या प्रकरणाचे मास्टरमाईंड होते." असा आरोप अनिल देशमुख यांनी केला.
- झूट बोले कव्वा काटे : अनिल देशमुख यांनी परमवीर सिंगांवर केलेल्या आरोपा नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले "झुठ बोले कौआ काटे, काले कौअेसे डरियो..", अश्या एका वाक्यात त्यांनी अनिल देशमुख यांना टोला लावला आहे.
हेही वाचा
- "लाडका मतदार योजना आणा म्हणजे सगळ्यांना पैसे वाटप करण्यासाठी मोकळे..." राज ठाकरेंची सरकारवर खोचक टीका - Raj Thackeray on Mahayuti
- अनिल देशमुखांच्या संदर्भात बदनामीकारक होर्डिंग; भाजयुमोचे शहराध्यक्ष बादल राऊतांवर गुन्हा दाखल, नेमका वाद काय ? - Anil Deshmukh Hoarding
- विधानसभेसाठी मनसेचे दोन शिलेदार जाहीर; बाळा नांदगावकर, दिलीप धोत्रे मैदानात - MNS Candidate List
- राज्य सरकारला दिलासा, 'मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने' विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली - Mumbai High Court