मुंबई : विधानसभा निवडणूक 2024 साठी सर्वपक्षीय उमेदवार याद्या जाहीर होत आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवारी यादीची उत्सुकता लागली होती. राष्ट्रवादी शरद पवार गटानं यादी जाहीर केल्यानुंतर लगेच काँग्रेसनं 48 उमेदवारांची घोषणा केली.
दिग्गजांना मिळाली संधी : काँग्रेसनं आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर केली. पहिल्या उमेदवारी यादीमध्ये 48 उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेसच्या पहिल्या यादीमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यासारख्या ज्येष्ठ आमदारांचा समावेश आहे. तसेच, या यादीतून पुन्हा घराणेशाही दिसून आली आहे,
वर्षा गायकवाडांची बहीण रिंगणात : मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांची बहीण ज्योती गायकवाड यांना धारावी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. माजी मंत्री आरिफ नसीम खान यांना चांदिवलीमधून उमेदवारी मिळाली आहे. साकोलीमधून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले रिंगणात असतील. ब्रम्हपुरीमधून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. संगमनेरमधून बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी मिळाली. कराड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी मिळाली.
48 उमेदवारांची पहिली यादी
1. अक्कलकुवा - ॲड. के.सी. पडवी (ST)
2.शहादा - राजेंद्रकुमार कृष्णराव गावित (ST)
3. नंदुरबार - किरण दामोदर तडवी (ST)
4.नवापूर - श्रीकृष्णकुमार सुरुपसिंग नाईक (ST)
5.साक्री - एसटी प्रवीणबापू चौरे
6.धुळे ग्रामीण - कुणाल रोहिदास पाटील
7.रावेर - ॲड. धनंजय शिरीष चौधरी
8.मलकापूर - राजेश पंडितराव एकाडे
9.चिखली - राहुल सिद्धिविनायक बोंद्रे
10.रिसोड - अमित सुभाषराव झनक
11.धामणगाव रेल्वे -प्रा.वीरेंद्र वाल्मीकराव जगताप
12.अमरावती - डॉ. सुनील देशमुख
13.तेओसा - ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर
14.अचलपूर - अनिरुद्ध @ बबलूभाऊ सुभानराव देशमुख
15.देवळी - रणजित प्रताप कांबळे
16.नागपूर दक्षिण पश्चिम - प्रफुल्ल विनोदराव गुडधे
17.नागपूर मध्यवर्ती - बंटी बाबा शेळके
18.नागपूर पश्चिम - विकास पी. ठाकरे
19.नागपूर उत्तर - SC डॉ. नितीन काशिनाथ राऊत
20 साकोली - नानाभाऊ फाल्गुनराव पटोले
21.गोंदिया- गोपालदास शंकरलाल अग्रवाल
22.राजुरा- सुभाष रामचंद्रराव धोटे