मुंबई Congress Meeting : राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला हात दाखवत भाजपात प्रवेश केलाय. त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विधिमंडळ सदस्यांची बुधवारी बैठक बोलावली होती. मात्र, ती स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा काँग्रेस विधिमंडळ नेत्यांची मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडली.
सहा आमदार गैरहजर :अशोक चव्हाण हे काँग्रेसला रामराम करत भाजपामध्ये दाखल झाले. त्यांच्यासोबत काँग्रेसचे इतर आमदारही भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. मात्र, या सर्व अफवा आहेत. सर्व आमदार काँग्रेससोबतच एकजुटीनं आहेत, असं स्पष्टीकरण काँग्रेस नेत्यांकडून देण्यात आलं होतं. मात्र, आज झालेल्या बैठकीत काँग्रेसचे सहा आमदार गैरहजर होते. त्यामुळं पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, गैरहजर आमदारांनी याबाबतची आधीच माहिती आम्हाला दिली होती. त्यामुळं ते भाजपाच्या संपर्कात आहेत या सर्व अफवा असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेत्यांनी बैठकीपूर्वीच दिली होती.
कोणते आमदार गैरहजर? : काँग्रेस विधिमंडळाची बैठक मुंबईत पार पडली. यावेळी काँग्रेसचे 36 आमदार उपस्थित होते तर सहा आमदार हे अनुपस्थित होते. झिशान सिद्दिकी, अस्लम शेख, अमित देशमुख, मोहन हंबर्डे, जितेश अंतापुरकर, माधवराव जवळगावकर है सहा आमदार बैठकीला गैहजर होते. त्यामुळं हे सहा आमदार भाजपाच्या संपर्कात तर नाहीत ना? अशी चर्चा आता पुन्हा सुरू झालीय.
राज्यसभा बिनविरोध होणार : मागच्या निवडणुकीत घडलं तसं आता घडणार नाही, असा विश्वास काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलाय. या बैठकीत 20 फेब्रुवारी रोजी होणारं विशेष अधिवेशन आणि 26 फेब्रुवारीला होणाऱ्या बजेटविषयी चर्चा झालीय. आमच्याकडं राज्यसभा निवडणूक जिंकण्यासाठी सदस्य संख्या आहे. सोबत मित्रपक्ष सदस्य देखील आहेत. त्यामुळं चिंता करण्याची गरज नाही. आमचा उमेदवार निवडून येईल, असंही थोरात यावेळी म्हणाले.
हेही वाचा -
- दीड वर्षात शेतकऱ्यांना १० ते १२ हजार कोटी दिले आहेत-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- Balasaheb Thorat On India : 'इंडिया'चा भाजपानं घेतला धसका, सत्ता जाण्याच्या भीतीनं भाजपाचं कारस्थान- थोरात
- Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रात लवकरच निवडणुका होणार; काँग्रेस विधिमंडळ पक्षाची विधानभवनात बैठक