महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

सावज टप्प्यात येताच करेक्ट कार्यक्रम केला, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

मुख्यमंत्र्यांच्या पश्चिम महाराष्ट्रातील प्रचाराचा शुभारंभ मंगळवारी साताऱ्यातील कोरेगाव आणि पाटण विधानसभा मतदारसंघात झाला. यावेळी त्यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

CM Eknath Shinde On Uddhav Thackeray
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 5, 2024, 7:06 PM IST

सातारा : बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार सोडून काही लोकांनी कॉंग्रेसशी घरोबा केला. तेव्हा 'उठाव केव्हा करायचा'? अशी विचारणा अनेकजण माझ्याकडं करत होते. मी त्यांना योग्य वेळ येईपर्यंत थांबण्याचा सल्ला देत होतो. अखेर सावज टप्प्यात आलं आणि कार्यक्रम केला, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.



म्हणून शंभूराजेंना दोन जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद :पाटण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शंभूराज देसाई यांच्या प्रचार शुभारंभ सभेत मुख्यमंत्री बोलत होते. ते पुढे म्हणाले की, दोन वर्षापूर्वी आम्ही जो उठाव केला, त्या उठावामध्ये शंभूराज देसाई हे दोन पावलं पुढं होते. म्हणून त्यांना दोन जिल्ह्याचं पालकमंत्री केलं. तसंच या निवडणुकीत त्यांच्या समोर विरोधक कोणीही असू दे, शंभूराजेच गड सर करणार, असा विश्वास देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.



आमच्या इच्छेविरूद्ध कॉंग्रेसशी घरोबा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, २०१९ च्या निवडणूक निकालानंतर आमच्या इच्छेविरुध्द उध्दव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेससोबत घरोबा केला. त्यामुळं आम्ही उठावाचं पाऊल उचललं. उठावापूर्वी अनेकजण विचारायचे की, कधी करायचा त्यांना मी सांगितलं की, करेक्ट कार्यक्रम करायला वेळ साधायची असते. सावज टप्प्यात यावं लागतं. ते टप्प्यात आलं आणि करेक्ट कार्यक्रम झाला, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.



लाडक्या बहिणींसाठी जेलमध्ये जायला तयार : लाडक्या बहिणींना पैसे दिले तर तुमच्या पोटात का दुखतंय? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना केला. ही योजना बंद व्हावी म्हणून मविआचे नेते उच्च न्यायालयात गेले. सरकार आल्यावर चौकशी लावून दोषींना जेलमध्ये टाकू म्हणाले. हा एकनाथ शिंदे लाडक्या बहिणींसाठी शंभर वेळा जेलमध्ये जायला तयार आहे. लाडक्या बहिणींच्या योजनेत खोडा घालणाऱ्यांना कोल्हापुरी जोडा दाखवा. विरोधकांच्या खोट्या प्रचारापासून सावध राहा. विरोधकांना चारीमुंड्या चित करा. असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

हेही वाचा -

  1. मशालीचा प्रकाश महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचणार, माहीमचे उबाठाचे उमेदवार महेश सावंत यांना विश्वास
  2. शरद पवार यांचे संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत, अजित पवारांबाबत म्हणाले, "बारामतीत.."
  3. रेल्वेतील हिंदी भाषक टीसीनं मराठी प्रवाशाकडूनच मराठीची मागणी न करण्यासाठी घेतला लिखित माफीनामा; नंतर झालं असं काही...

ABOUT THE AUTHOR

...view details