नागपूर Chandrashekhar Bawankule :उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार आणि अनिल परब यांना अडचणीत आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर दबाव टाकला. त्याचवेळी तत्कालीन गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख यांनी एफआयआर दाखल करून त्यांना आरोपी का केले नाही, असा प्रश्न भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यांना विचारला आहे. आपल्या भ्रष्टाचारावर पांघरून घालण्यासाठीचं ते खोटा नॅरेटिव्ह पसरवत असल्याचा थेट आरोप, चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. ते आज नागपूर येथे बोलत होते.
गृहमंत्री हतबल नसतात : गृहमंत्र्यांवर कुणी ही दबाव टाकू शकत नाही, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असं बावनकुळे म्हणाले. दोन-अडीच वर्षांनंतर देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकला असं सांगणं तत्कालीन गृहमंत्र्याचं खोटेच आहे. तत्कालीन गृहमंत्री ऐवढे हतबल असू शकतात. अशा कपोलकल्पित बातम्या तयार करणं योग्य नाही. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये असल्यास त्यांचे सर्व भष्ट्राचार बाहेर काढतात म्हणून त्यांना थांबविण्यासाठी समाजा-समाजात विभागणी करून महाराष्ट्राला असुरक्षित करण्याचं काम इंडिया आघाडी करत असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे.
माझ्या विरोधात देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुरावे आहेत ते त्यांनी जगजाहीर करावं, असं आवाहन अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. मी काल केलेल्या आरोपांवर ठाम आहे. मी पुराव्याशिवाय बोलत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर दबाव टाकल्याचे सर्व पुरावे पेन ड्राईव्हमध्ये आहे. वेळ आल्यावर मी हे पुरावे दाखवेल. अनिल देशमुख, माजी गृहमंत्री