महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

कुणबी दाखला मिळवणं आता सोप्पं; कसं ते जाणून घ्या... - Chandrakant Patil On Reservation - CHANDRAKANT PATIL ON RESERVATION

Chandrakant Patil On Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने उपसमितीची स्थापना केली आहे. आज (सोमवारी) या समितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार की नाही, यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महत्त्वाचे भाष्य केलं.

Chandrakant Patil On Maratha Reservation
मंत्री चंद्रकांत पाटील आणि मराठा आरक्षण (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 30, 2024, 10:11 PM IST

मुंबईChandrakant Patil On Reservation: राज्यात एकीकडं विधानसभा निवडणुकांसाठी तयार केली जात असताना, मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा आरक्षण मिळविण्यासाठी उपोषण, आंदोलन करत आहेत. याच पार्श्वभूमीवर सोमवारी मराठा आरक्षण उपसमितीचे बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. यावेळी मराठा समाजातील विविध संघटना, त्यांचे प्रतिनिधी, निवृत्त न्यायाधीश, कायदेतज्ज्ञ, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री शंभूराज देसाई आणि सरकारी अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.



ईडब्ल्यूएसमधून आरक्षण मिळावं: बैठकीत मराठा संघटना आणि आमच्यात सकारात्मक चर्चा झाली. यावेळी अण्णासाहेब जावळे यांच्या नावाने महामंडळ स्थापन करणे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल या निकषावर आणि ईडब्ल्यूएसमधून आम्हाला आरक्षण मिळावं, अशी मागणी करण्यात आली. तसेच कुणबी दाखले ही मराठा समाजाला मिळावेत यावरही चर्चा झाली. यावेळी सर्व मराठ्यांना कुणबी करा आणि कायद्याच्या चौकटीत आरक्षण द्या. अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, मराठ्यांना कुणबी दाखले कसे देता येईल, यावर कायदेशीररित्या चर्चा झाली, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

सरकार काढणार तोडगा :मराठा आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मकच आहे. यावर नक्कीच सरकार तोडगा काढेल. पण हे आरक्षण देताना मूळ ओबीसी आरक्षणाला कुठंही धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही सरकारची भूमिका आहे. या संदर्भात दोन दिवसानंतर निवृत्त न्यायाधीश, कायदेतज्ञ आणि मराठा आरक्षण उपसमिती यांच्यात पुन्हा एकदा बैठक होणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.


दाखला मिळवणं सोपं : शिंदे समितीने जो अहवाल दिलाय, तो काय अहवाल आहे. मराठा आरक्षणामध्ये शिंदे समितीने कुणबी दाखल्याबद्दल काय काम केलंय? असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांना विचारला असता, मराठा आरक्षणाबाबत शिंदे समितीने कुणबी दाखला मिळविण्याबाबत आणखीन सोप्प काम केलंय. यापूर्वी कुणबी दाखल्यासाठी दहा पुरावे ग्राह्य धरले जायचे. परंतु आता या ठिकाणी तुम्हाला 42 पुरावे हे ग्राह्य धरले जाणार आहेत. याचाच अर्थ कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आता सहज आणि सोप्प काम शिंदे समितीनं केलंय. परिणामी आता मराठ्यांना कुणबी दाखला मिळविण्यासाठी जे कागदपत्र लागतात. त्यामध्ये अधिक अडचणी येतील असं मला वाटत नाही, असंही पाटील यावेळी म्हणाले.

हेही वाचा -

  1. "ओबीसीचे अ, ब, क, ड असे गट पाडले तर मराठा समाजालाही फायदा..." चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान - Chandrakant Patil On Reservation
  2. देवेंद्र फडणवीस होणार भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष ? काय आहेत निवडीमागची समीकरणं, काय म्हणाले भाजपातील नेते ? - Devendra Fadnavis
  3. देवेंद्र फडणवीस यांच्यात राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचे पूर्ण गुण: ही तर आमच्यासाठी आनंदाची बाब, 'या' मंत्र्यांनी व्यक्त केलं मत - Chandrakant Patil Statement

ABOUT THE AUTHOR

...view details