पुणे Baramati Loksabha 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या लोकसभेसाठी तयारी करत असून यंदा नणंद भावजय यांच्यात लढत होण्याची दाट शक्यता आहे. यावर आता खासदार सुप्रीया सुळे यांनी मी गेल्या 15 वर्षांपासून इथं खासदार असून मीही मतदारसंघात फिरल्याच त्यांनी म्हटलंय. आज पुण्यात कालवा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आढावा बैठक सुद्धा सुरू आहे. या बैठकीत खासदार सुप्रीया सुळे देखील हजर होत्या. ही बैठक संपल्यावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्या बोलत होत्या.
काय म्हणाल्या सुप्रीया सुळे : यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघातील लढतीवरुन खासदार सुप्रीया सुळे म्हणाल्या, "मी गेल्या 15 वर्षांपासून मी या मतदारसंघाची प्रतिनिधी आहे. मला मतदारसंघात फिरणं म्हणजे कुटंबात फिरण्यासारखं वाटतं. गेल्या 18 वर्षांचे माझे मतदारसंघात वयक्तिक प्रेमाचे ऋणानुबंध आहेत. या मतदारसंघात 2007 पासून मी सातत्यानं फिरत होते. लोकशाहीत प्रत्येकाला फिरण्याचा आधिकार आहे."