महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

"...तर सुनेत्रा पवारांच्या विरोधात उभं राहू नका", प्रविण दरेकरांचा सुप्रिया सुळेंना टोला - Baramati Lok Sabha Elections - BARAMATI LOK SABHA ELECTIONS

Pravin Darekar On Supriya Sule : बारामती लोकसभा मतदारसंघाकडं अवघ्या देशाचं लक्ष लागलंय. याचं कारण म्हणजे इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कन्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार अशी लढत होणार आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळातही यावरुन चर्चांना उधाण आलंय.

Baramati Lok Sabha Elections BJP Leader Pravin Darekar criticized Supriya Sule over Sunetra Pawar candidature
सुप्रिया सुळे आणि प्रविण दरेकर

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 31, 2024, 4:36 PM IST

प्रविण दरेकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली

मुंबई Pravin Darekar On Supriya Sule : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देण्यात आली असून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळं बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगणार आहे. दोन्ही उमेदवार सध्या मतदारसंघात गाठीभेटींवर भर देत आहेत. तर अशातच सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी "भाजपानं पवार कुटुंबीय फोडून, माझ्या आईला माझ्या विरोधात उतरवलं," असल्याचं वक्तव्य केलं होतं. यावरच आता भाजपाचे आमदार प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले प्रविण दरेकर? : "सुप्रिया सुळेंना आपल्या वहिनी आई समान वाटत असेल तर, त्यांनी आईच्या विरोधात उभा राहायला नको. त्यांनी आईला समर्थन दिलं पाहिजे. परंतु, एका बाजूला आई समान म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला टीका करत भावनिक वातावरण निर्मिती करायचं. तसंच काही गेम करता येईल का? असा प्रयत्न सुप्रिया सुळे करताय," असा आरोप प्रविण दरेकरांनी केला. पुढं ते म्हणाले की, "त्यांनी देशाच्या विषयांवर बोलायला हवं, मतदार संघातील प्रश्नांविषयी बोलायला हवं. मात्र, त्या तसं करत नाही. केंद्रातील मोदी सरकारवर टीका करण्यासारखं काही नाही, तसंच अजित पवारांचं कर्तृत्व इतकं मोठं आहे की, त्यांच्या कर्तृत्वाला आव्हान देता येणार नाही, म्हणून त्या कुटुंबाच्या गोष्टी करत असतात. सगळ्या पवार कुटुंबानं अजित पवारांना एकटं सोडलंय. मात्र, बारामतीकर अजित पवारांचं कुटुंब म्हणून त्यांच्या पाठीमागं उभे राहतील", असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


घरफोड्या नेता कोण सर्वाना माहिती : तसंच भाजपानं पवार कुटुंबीय फोडल्याचा आरोप सुप्रिया सुळे सातत्यानं करत आहेत. यावरुन टीका करत प्रविण दरेकर म्हणाले की, "सुप्रियाताई महाराष्ट्रातील जनतेला नीट माहीत आहे की, फोडाफोडीचं राजकारण करणारा नेता या राज्यात कोण आहे. ज्यांनी या महाराष्ट्रात अनेक घरं फोडली, तो घरफोड्या नेता कोण आहे हे सर्वांनाच माहीत आहे."

हेही वाचा -

  1. अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नणंद-भावजयांचा प्रचार सुरू; दोघींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास - Supriya vs Sunetra
  2. "ट्रिपल इंजिन सरकार केवळ जागावाटप आणि...", बारामतीतील पाणी प्रश्नावरुन सुप्रिया सुळेंनी सरकारला घेरलं - Supriya Sule News
  3. विजय शिवतारे यांनी अजित पवारांच्या विरोधात का घेतली भूमिका? - Lok Sabha election

ABOUT THE AUTHOR

...view details