बारामतीCM Eknath Shinde On Baramati City : बारामती येथे 'नमो महारोजगार' मेळावा (Namo Rojgar Melava) घेण्यात आला. यावेळी विविध विकास कामांचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. बारामती शहर हे एक विकासाचं प्रारूप आहे. 'नमो रोजगार मेळाव्यामुळं तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे. त्यांनी आपलं भवितव्य साकारावं', असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी केलंय. यापूर्वी नागपूर, लातूर, अहमदनगर येथे मेळावे झाले असून बारामती येथे आयोजित हा मेळावा सर्व विक्रम मोडणारा आहे. यातून २५ हजार युवांना रोजगार मिळणार आहे.
बारामती शहर विकासाचे मॉडेल: बारामती शहर हे एक विकासाचे प्रारूप (मॉडेल) आहे. शहराच्या विकासात शरद पवार, अजित पवार यांचं मोठं योगदान आहे. विकास कामे करताना सर्व कामे वेळेत आणि दर्जेदार व्हावीत हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कटाक्ष असतो. आज उद्घाटन झालेल्या प्रकल्पांच्या दर्जात कुठेही तडजोड झाली नाही हे दिसून येतं.
राज्यातील पहिले मॉडेल बसस्थानक: पोलीस हा कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम करत असताना सण, उत्सव, आंदोलने अशा कालावधीत ऊन, पाऊस वाऱ्यामध्ये रस्त्यावर उभा असतो. म्हणून त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा करत असताना त्यांना दर्जेदार सुविधाही दिल्या पाहिजेत. त्या बारामतीतील या पोलीस वसाहतीत दिल्या आहेत. राज्यातील सर्व बसस्थानके सर्व सोई-सुविधा युक्त अशी सुसज्ज 'बसपोर्ट' करून प्रवाशांना सर्व सोई-सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. बारामतीमध्ये राज्यातील पहिले मॉडेल बसस्थानक झाले आहे.