महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

'मिले सूर मेरा तुम्हारा, तो सूर बने हमारा'; कट्टर राजकीय विरोधक अडसूळ-राणा एकत्र, अनेक वर्षांचं शत्रुत्व संपलं - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha Election 2024 : राजकारणात कुणी कुणाचा शत्रू नसतो, असं आपण अनेकदा ऐकतो. हेच वास्तव अमरावतीत पाहायला मिळालं. एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले राणा दाम्पत्य आणि अडसुळ कुटुंब चक्क एकत्र आल्याचं पाहायला मिळालंय.

Lok Sabha Election 2024
'मिले सूर मेरा तुम्हारा, तो सूर बने हमारा'; कट्टर राजकीय विरोधक अडसूळ-राणा एकत्र, अनेक वर्षांचं शत्रुत्त्व संपलं

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 17, 2024, 2:02 PM IST

Updated : Apr 17, 2024, 4:49 PM IST

अमरावती Lok Sabha Election 2024 : 2014 आणि 2019 मध्ये एकमेकांविरोधात लोकसभा निवडणूक लढवणारे नवनीत राणा आणि आनंदराव अडसूळ यांची अमरावतीच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक अशी ओळख आहे. राणा आणि अडसूळ यांच्यातून विस्तवही जात नाही. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. आज अडसूळ आणि राणा पहिल्यांदा एकत्र आले. त्यांच्यात हास्यविनोद झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान बनवण्यासाठी आपण एकत्र आल्याचं माजी आमदार अभिजीत अडसूळ आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांनी सांगितलं.



अडसुळांच्या घरी राणांचं स्वागत : भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा आणि बडनेराचे आमदार रवी राणा आज सकाळी आनंदराव अडसूळ यांच्या नवसारी येथील निवासस्थानी अडसूळ कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी अभिजीत अडसूळ यांच्या पत्नीने नवनीत राणांचं औक्षण करुन स्वागत केलं. अभिजीत अडसूळ यांनी राणा दाम्पत्यासोबत हसत खेळत चर्चा केली. यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची आमदार रवी राणा यांच्याबरोबर अभिजीत अडसूळ यांनी ओळख करून दिली. राणा दाम्पत्यानेही उपस्थित सर्वांनाच रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या.

राजकारणात कोणीही शत्रू नाही : यावेळी आमदार रवी राणा आणि माजी आमदार अभिजीत अडसूळ या दोघांनी राजकारणात कधीही कोणी कोणाचा कायम शत्रू नसतो, हे 'राखून ठेवलेलं विधान' पत्रकारांसमोर केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बळ देण्यासाठी आम्ही सोबत आहोत, असं आमदार रवी राणा आणि अभिजीत अडसूळ दोघांनीही स्पष्ट केलं. आतापर्यंत आम्ही निवडणुकीच्या प्रचारात नव्हतो. आज मात्र आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलीय. नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी आमचे शिवसैनिक सज्ज आहेत. निवडणूक प्रचारासंदर्भातील रणनीतीबाबत आम्ही आज बैठक घेऊन पुढची दिशा ठरवणार असल्याचं अभिजीत अडसूळ यावेळी म्हणाले.


राणा दाम्पत्याने प्रवीण पोटे यांच्या घरी दिली भेट : माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या घरी भेट देण्यापूर्वी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी भाजपाचे नेते प्रवीण पोटे यांच्या राठी नगर येथील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. सुमारे तासभर राणा दाम्पत्य आणि प्रवीण पोटे यांच्यात चर्चा झाली.

हेही वाचा :

  1. अभिजीत अडसूळ निवडणुकीच्या रिंगणात; "नवनीत राणांचा गेम करणार" - Amravati Lok Sabha Constituency
  2. अमरावती लोकसभा निवडणूक : आमच्या समोर सर्व पर्याय खुले; अभिजीत अडसूळ यांचा गर्भित इशारा - Amravati Lok Sabha Elections
Last Updated : Apr 17, 2024, 4:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details