पुणे (बारामती) Lok Sabha Election 2024 :बारामती लोकसभा निवडणुकीकडं (Baramati Lok Sabha)महाराष्ट्रच लक्ष लागलंय. येथे बारामतीमध्ये नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगणार आहे. बारामतीच्या या लढाईत अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात संघर्ष आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर होते. बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथे सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सज्जड दम दिलाय.
"कुंकू लावायचा असेल तर एकाचेचं लावा" :सभेत अजित पवार हे त्यांच्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले, जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली तर पुन्हा माझ्याकडं पायरी चढायचं नाही. काहीजण माझी सभा झाली रे झाली की, समोरच्या पार्टीकडं जातात. बिनविरोध मी पदे दिली. मात्र, तुम्ही त्यांचा प्रचार करत आहात. कुंकू लावायचा असेल तर एकाचेचं लावा". माझे तरी लावा नाही तर त्यांचं तरी लावा, हा काय चाटाळपणा लावलाय? असा पश्र अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना विचारला आहे.