पुणे: राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अशी लढत होताना पाहायला मिळतेय. राष्ट्रवादीतील फुटीनंतर बारामती विधानसभा मतदारसंघात काका विरुद्ध पुतणे अशी लढत होत आहे. त्यामुळं अजित पवार पुन्हा आमदार होणार की युगेंद्र पवार विजय मिळवणार, अशी जोरदार चर्चा सध्या राज्यात आहे.
पवार कुटुंबियांसोबत भाऊबीज नाही : आज भाऊबीजनिमित्त बारामतीत सर्वत्र पवार कुटुंब एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. मात्र, अजित पवार हे एकत्र आलेले पाहायला मिळाले नाहीत. आज बारामतीत खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांच्या भगिनींनी आपल्या निवासस्थानी बंधू राजेंद्र पवार, श्रीनिवास पवार, रणजित पवार, जयंत पवार, अभिजित पवार यांचं औक्षण करत पवार कुटुंबियांसोबत भाऊबीज साजरी केली. तसंच यावेळी बारामती विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी देखील भाऊबीज साजरी केली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे, राजेंद्र पवार यांची कन्या सई पवार, रणजित पवार यांच्या कन्या देवयानी आणि इरा आणि त्यांच्या इतर बहिणी उपस्थित होत्या.
भाऊबीज साजरी करताना पवार कुटुंब (ETV Bharat Reporter) दोन वेगवेगळ्या ठिकाणी भाऊबीज: महाराष्ट्राच्या राजकारणात यंदाची विधानसभा निवडणूक पवार कुटुंबीयांसाठी विशेष अशीच आहे. दिवाळी पाडव्याप्रमाणे पवारांच्या भाऊबीज दोन वेगवेगळ्या ठिकाणी साजऱ्या झाल्या. काटेवाडी आणि गोविंदबाग अशा दोन्ही ठिकाणी या भाऊबीज साजऱ्या झाल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज सकाळी काटेवाडीत त्यांच्या दोन्ही बहिणींनी ओवाळलं.
पवार कुटुंबात पहिल्यांदा दोन दिवाळी पाडवा :गेल्या अनेक वर्षांपासून बारामतीमधील गोविंद बाग येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या दिवाळी पाडवा कार्यक्रमात राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते हे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी येत असतात. या पाडवा कार्यक्रमात आपल्याला पवार कुटुंब एकत्र असल्याचं पाहायला देखील मिळतं. पण राष्ट्रवादी फुटीनंतर आता अजित पवार यांनी देखील बारामतीमधील काटेवाडी येथे दिवाळी पाडवा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. तर पवार कुटुंबात पहिल्यांदा दोन दिवाळी पाडवा होताना पाहायला मिळाला.
हेही वाचा -
- पवार कुटुंबीयांचा बारामतीत वेगवेगळा पाडवा; कार्यकर्ते म्हणाले,"सगळंच वेगळं झाल्यामुळं..."
- बारामतीत दोन पाडवा; दोन्ही पवारांकडे गर्दीच गर्दी, विधानसभेआधी दोन्ही पवारांनी दाखवून दिली ताकद
- बारामतीत पवारांचे 2 पाडवा मेळावे; शरद पवार म्हणाले, "जुनी पद्धत कायम राहिली असती, तर आनंद झाला असता"