मेलबर्न Sam Konstas Records : ऑस्ट्रेलियाचा युवा सलामी फलंदाज सॅम कॉन्स्टासनं मेलबर्नच्या मैदानावर भारताविरुद्धच्या बॉक्सिंग-डे कसोटी सामन्यात पदार्पण करुन खूप चांगली कामगिरी केली. ज्यामध्ये त्यानं आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या पहिल्याच डावात 60 धावा केल्या आणि अनेक नवीन विक्रमही केले. या सामन्यात पहिल्या तीन सामन्यांमध्ये फलंदाजीत चांगली कामगिरी करु शकलेल्या नॅथन मॅकस्विनीच्या जागी सॅम कॉन्स्टासचा ऑस्ट्रेलियन संघाच्या प्लेइंग 11 मध्ये समावेश करण्यात आला. सॅमनं या संधीचा पुरेपूर फायदा घेत आक्रमक फलंदाजी करत अवघ्या 65 चेंडूत 60 धावा केल्या. सॅम कॉन्स्टास ऑस्ट्रेलियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा चौथा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.
Sam Konstas taps the Australian crest as he makes a remarkable 50 on debut! #AUSvIND | #MilestoneMoment | @nrmainsurance pic.twitter.com/y1tp4rT9qG
— cricket.com.au (@cricketcomau) December 26, 2024
बॉक्सिंग-डे कसोटीत पदार्पणात अर्धशतक झळकावणारा चौथा खेळाडू : ऑस्ट्रेलियन संघाच्या वतीनं, सॅम कॉन्स्टासला बॉक्सिंग-डे कसोटीत थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण सामना खेळण्याची संधी मिळाली. कॉन्स्टासनं उत्कृष्ट अर्धशतक झळकावून हा सामना संस्मरणीय बनवला ज्यामध्ये तो सलामीवीर म्हणून पदार्पण करताना अर्धशतक झळकावणारा बॉक्सिंग-डे कसोटी इतिहासातील चौथा खेळाडू ठरला. कॉन्स्टासच्या आधी हा पराक्रम वेस्ट इंडिजच्या रॉय फ्रेडरिक, भारताचा मयंक अग्रवाल आणि ऑस्ट्रेलियाचा एड कोवान यांनी केला होता. फ्रेडरिक्सनं 1968 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 76 धावांची खेळी केली होती, तर मयंक अग्रवालनं 2018 मध्ये 76 धावा आणि कोवाननं 2011 मध्ये 68 धावा केल्या होत्या. याशिवाय सॅम कॉन्स्टासनं आज 60 धावांची खेळी केली आहे.
WHAT ARE WE SEEING!
— cricket.com.au (@cricketcomau) December 26, 2024
Sam Konstas just whipped Jasprit Bumrah for six 😱#AUSvIND | #PlayOfTheDay | @nrmainsurance pic.twitter.com/ZuNdtCncLO
ऑस्ट्रेलियासाठी कसोटीत अर्धशतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू : कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून अर्धशतक झळकावणारा सॅम कॉन्स्टास आता सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. सॅमनं वयाच्या अवघ्या 19 वर्षे 85 दिवसांत ही कामगिरी केली आहे. कॉन्स्टासनं या बाबतीत नील हार्वे आणि आर्ची जॅक्सनचे रेकॉर्ड तोडले आहेत. या यादीत पहिला क्रमांक इयान क्रेगचा आहे, ज्यानं 1953 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून खेळताना 17 वर्षे 240 दिवस वयाच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक झळकावलं होते.
A SOLD OUT MCG CROWD GIVING A STANDING OVATION TO SAM KONSTAS. pic.twitter.com/eEWtI7GrmQ
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 26, 2024
2024 साली ऑस्ट्रेलियाची 50 हून अधिक धावांची तिसरी सलामीची भागीदारी : 2024 च्या सुरुवातीला डेव्हिड वॉर्नरनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाच्या सलामीच्या जोडीमध्ये अनेक बदल दिसून आले. भारताविरुद्ध बॉक्सिंग-डे कसोटीत सॅम कॉन्स्टास आणि उस्मान ख्वाजा यांच्यातील पहिल्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी ही कांगारु संघाची 2024 सालातील तिसरी अर्धशतकी सलामी भागीदारी आहे. याआधी डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांच्यात सिडनीमध्ये पाकिस्तानविरुद्ध 70 धावांची सलामीची भागीदारी झाली होती, तर न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टनच्या मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यात ख्वाजा आणि स्मिथ यांच्यात पहिल्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी झाली होती.
SAM KONSTAS SMASHED A 52 BALL FIFTY ON TEST DEBUT. 🤯
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 26, 2024
- Take a bow, Konstas! pic.twitter.com/jggJh5s5Qt
हेही वाचा :