महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

'गरिबी हटाव नाही, तर गरीब हटाव', ही भाजपाची नीती; आदित्य ठाकरे यांनी सुनावले खडेबोल - Aditya Thackeray - ADITYA THACKERAY

Aditya Thackeray on Piyush Goyal : पियूष गोयल (Piyush Goyal) यांनी मुंबईतील सर्व झोपडपट्टी हटवून त्यांना मिठागरांवर हलवण्याचं स्वप्न बोलून दाखवलं होतं. यावर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलीय.

Aditya Thackeray
आदित्य ठाकरे

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 30, 2024, 8:12 PM IST

प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे

मुंबई Aditya Thackeray on Piyush Goyal:उत्तर मुंबईचे भाजपाचे उमेदवार पियूष गोयल (Piyush Goyal) यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीवरून आदित्य ठाकरे यांनी खडेबोल सुनावले आहेत. पियुष गोयल यांनी मुलाखतीत मुंबईतील झोपडपट्टी काढून टाकून त्या मिठागरांवर सोडायच्या असल्याचं स्वप्न बोलून दाखवलं. त्यावर आदित्य ठाकरे यांनी झोपडपट्टीवासियांना हटवण्याची हुकूमशाही आम्ही मुंबईत, महाराष्ट्रात चालू देणार नाही, असा इशारा दिलाय.

हा भाजपाचा प्लॅन : उत्तर मुंबईचे भाजपाचे अधिकृत उमेदवार पियुष गोयल यांची शुक्रवारी मुलाखत झाली होती. त्यांनी या मुलाखतीमध्ये सांगितलं की, त्यांचं स्वप्न आहे की, मुंबईतील सर्व झोपडपट्टी काढून टाकायच्या. कदाचित त्यांना मिठागरांवर नेऊन सोडायचं. मुख्य गोष्ट हीच आहे की, अनेकवेळा आपण पाहिलं आहे की, मुंबईतल्या सर्व झोपडपट्टी पुनर्वसन योजना आहेत, त्या काही काही ठिकाणी मार्गी लागल्या आहेत. काही ठिकाणी अजून प्रक्रियेत आहे. एसआरएच्या यंत्रणेला आणि सरकारला माहिती आहे की, सर्व होत असताना मुंबईला खोटं बोलायचं, भूल थापा मारायचं आणि भयानक योजना मुंबई शहरांमध्ये आणणं किती धोकादायक आहे. जे झोपडपट्टीमध्ये राहतात त्यांचा रोजगार हा आजूबाजूला असतो. नोकऱ्या, स्थानिक रोजगार, उद्योग असतील या सर्वातून बळजबरी त्यांना खेचून घ्यायचं आणि मुंबईचे मिठागरे आहेत तेथे नेऊन सोडायचं. हा भाजपाचा प्लॅन् लोकांसमोर आलेला आहे.

मुंबईत हुकूमशाही चालू देणार नाही : मिठागरांचं राजकारण करून मुंबईच्या विकासात मिठाचा खडा टाकण्याचं काम भाजपानं केलं. पियूष गोयल यांनी मुंबईतील सर्व झोपडपट्टी हटवून त्यांना मिठागरांवर हलवण्याचं स्वप्न बोलून दाखवलं. भाजपाची स्पष्ट नीती आहे की, 'गरिबी हटाव नाही तर गरीब हटाव' हे लोकांसमोर आलं आहे. दोन-तीन घोटाळे माझ्या हाती आलेले आहेत. त्याच्यावर पुढच्या आठवड्यात बोलू आता नाही. मुंबईत लाखो जनता मेहनत करते. विकसित भारत हे जे काही पोट्रियाल सुरू आहे त्या विकासात या लोकांचा सर्वात मोठा हात आहे. हे लोक दिवस रात्र न बघता मेहनत करत असतात. जर तुमचं स्वप्न असेल निवडून आल्यानंतर या झोपडपट्टीवासियांना इकडून काढून मिठागरांमध्ये सोडून देऊ. ही हुकूमशाही मुंबईत चालू देणार नाही.

हेही वाचा -

  1. 'गेला आदित्य कुणीकडे?' गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे राजकारणातून गायब, विरोधकांचं टीकास्त्र - Aaditya Thackeray
  2. गेल्या 2 वर्षात राजकीय नेत्यांना जीवे मारण्याच्या धमकीत वाढ, कोणकोणत्या नेत्यांना आली धमकी?
  3. "आपला इगो बाजूला ठेवून...", आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना सुनावले खडे बोल

ABOUT THE AUTHOR

...view details