वरुण धवन आणि त्याची पत्नी नताशा दलाल यांना मुलगी झाली.. नताशानं मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये 3 जून रोजी मुलीला जन्म देऊन वरुणच्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे.. नताशाला भेटण्यासाठी डेव्हिड धवन आणि कुटुंबातील इतर सदस्य हॉस्पिटलमध्ये पोहचले होते.. घरात नवीन सदस्य आल्यानं संपूर्ण धवन-दलाल कुटुंब आनंदी झालं आहे.. काही महिन्यांपूर्वी. वरुणनं नताशाच्या बेबी बंपवर किस करून फोटो शेअर केला होता.