महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / photos

वाणी कपूरचा 'शुद्ध देसी रोमान्स', पाहा अप्रतिम फोटो - वाणी कपूर हॉट फोटो

'वॉर', 'बेल बॉटम', 'बेफिक्रे' यांसारख्या चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल दाखवणारी अभिनेत्री वाणी कपूरला आज कोण ओळखत नाही. स्वबळावर तिनं हिंदी चित्रपटसृष्टीत आपली एक जागा निर्माण केली आहे. तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. अनेकदा ती आपले फोटो सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर शेअर करत असते.

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 15, 2024, 10:12 AM IST

वाणी कपूरनं आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती.
तिनं 2013 मध्ये 'शुद्ध देसी रोमान्स' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.
'शुद्ध देसी रोमान्स' चित्रपटामध्ये तिच्याबरोबर सुशांत सिंह राजपूत आणि परिणीती चोप्रा हे कलाकार होते.
या चित्रपटात वाणीनं तिच्या अभिनयानं आणि सौंदर्यानं चाहत्यांची मने जिंकली.
वाणीचा चित्रपटात प्रवेश करण्याचा प्रवास सोपा नव्हता ती हॉटेल इंडस्ट्रीत काम करायची.
वाणी कपूरचे सुरुवातीचे शिक्षण दिल्लीच्या माता जयकौर पब्लिक स्कूलमधून झाले.
त्यानंतर पुढील शिक्षणासाठी इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला आणि येथून तिनं पर्यटन विषयात बॅचलर पदवी मिळवली.
शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिनं जयपूरमधील ओबेरॉय हॉटेलमध्ये इंटर्नशिप केली आणि यानंतर ती आयटीसी हॉटेलमध्ये काम करू लागली.
वाणी ज्या हॉटेलमध्ये काम करत होती आणि तिथे एका चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. त्यावेळी वाणीही तेथे उपस्थित होती.
चित्रपटाचे शूटिंग पाहून वाणीनेही फिल्मी दुनियेत येण्याचा निर्णय घेतला, त्यासाठी तिनं हॉटेलची नोकरी सोडून मॉडेलिंगच्या दुनियेत प्रवेश केला.
2009 मध्ये तिनं 'स्पेशल ॲट 10' मधून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं.
वाणीच्या मेहनतीला लवकरच फळ मिळाले आणि दिग्दर्शक यश राज यांनी तिला 'शुद्ध देसी रोमान्स' चित्रपटासाठी संपर्क केला.

ABOUT THE AUTHOR

...view details