महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / photos

रणवीर सिंगच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्याच्या विशेष चित्रपटांबद्दल... - ranveer singh birthday - RANVEER SINGH BIRTHDAY

रणवीर सिंगला बॉलिवूडमधील अष्टपैलू कलाकार म्हणून ओळखले जाते. त्यानं अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका करून चाहत्याचे मन जिंकली आहे. आज 6 जुलै रोजी तो आपला 39 व्या वाढदिवस साजरा करत आहे. या विशेष प्रसंगी आम्ही तुम्हाला त्याच्या पडद्यावरील अफलातून भूमिकांबद्दल सांगणार आहोत. (ANI - photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 6, 2024, 6:44 PM IST

यशराज फिल्म्स अंतर्गत 2010 मध्ये रिलीज झालेल्या रोमँटिक कॉमेडी 'बँड बाजा बारात'मधून रणवीरनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. (ANI - photo)
'गोलियों की रासलीला राम-लीला' या चित्रपटामध्ये , रणवीरनं गुजराती मुलाची भूमिका साकारली होती. यात त्याच्याबरोबर दीपिका पदुकोण दिसली होती. (ANI - photo)
'बाजीराव मस्तानी'मध्ये त्यानं वीर पेशवा बाजीरावाची पॉवरफुल भूमिका साकारली होती. (ANI - photo)
'सिम्बा' रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समध्ये रणवीरनं इन्स्पेक्टर संग्राम भालेराव उर्फ ​​सिम्बा, एक भ्रष्ट पोलिसाची भूमिका साकारून चाहत्यांची मनं जिंकली होती. (ANI - photo)
'पद्मावत' या चित्रपटात त्यानं प्रथमच अलाउद्दीन खिलजी या निर्दयी मुघल सम्राटाची खलनायकी भूमिका साकारली होती. हा रणवीरच्या कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. (ANI - photo)
'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये त्यानं पंजाबी मुलाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्याच्याबरोबर आलिया भट दिसली होती. (ANI - photo)

ABOUT THE AUTHOR

...view details