मंदिरात कुठेही लोखंडाचा वापर केलेला नाही.. मंदिराच्या पहिल्या मजल्यावर श्रीरामाचे दरबार आहे.. राम मंदिर तीन मजली आहे. प्रत्येक मजला 20 फूट उंच आहे.. मंदिराजवळ एक ऐतिहासिक विहीर आहे.. मंदिराच्या भिंती आणि खांब देवी-देवतांच्या मूर्तींनी सजवलेले आहे.. श्री रामजन्मभूमी मंदिर परिसरात महर्षि वाल्मिकी. महर्षि वशिष्ठ यांची मंदिरेही बांधण्यात येणार आहेत.. भारतातील पारंपारिक तंत्रज्ञान वापरून बांधले जात आहे.. मंदिरात अपंग आणि वृद्धांच्या सोयीसाठी रॅम्प आणि लिफ्टची व्यवस्था करण्यात आली आहे.. मंदिराची लांबी (पूर्व-पश्चिम) 380 फूट. रुंदी 250 फूट आणि उंची 161 फूट आहे.. मंदिरात पाच मंडप (हॉल) आहेत.. राम मंदिर परिसराच्या चार कोपऱ्यांवर चार मंदिरे आहेत.