महाराष्ट्र

maharashtra

पुण्यात पावसाचा कहर सुरू असताना जवानांकडून बचावकार्य, नागरिकांसह प्राण्यांचीही केली पाण्यातून सुटका, पहा फोटो - flood again pune

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 4, 2024, 10:49 PM IST

Updated : Aug 4, 2024, 10:56 PM IST

पुण्यात सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसंच खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यानं सैन्यदलाची तुकडी एकतानगरमध्ये मदतकार्यासाठी तैनात करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयानं भारतीय सैन्यदलाला मदतीची विनंती केल्यानंतर सैन्यदलाची तुकडी तातडीनं मदतकार्यात दाखल झाली. पूरग्रस्त भागात तैनात असलेल्या या तुकडीत सुमारे 100 जवानांचा समावेश आहे. (ETV BHARAT Reporter)
भारतीय सैन्याची तुकडी पुणे शहरात दाखल झाली. (ETV BHARAT Reporter)
निवासी इमारतींमध्ये आपत्कालीन निर्गमन व्यवस्था सुरू करण्यात आली. (ETV BHARAT Reporter)
तुकडीमध्ये मराठा लाईट इन्फंट्रीचे पायदळ, बॉम्बे इंजिनिअर्स ग्रुपचे इंजिनियर टास्क फोर्स, खडकी येथील आर्मी हॉस्पिटलचे वैद्यकीय पथक यांचा समावेश आहे. (ETV BHARAT Reporter)
लहान मुलांसह रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं. (ETV BHARAT Reporter)
बचाव नौका, मानवरहित स्वयंचलित हेलिकॉप्टर (क्वाडकॉप्टर) आणि इतर आवश्यक उपकरणांनी सुसज्ज जवान यांनी बचावकार्यात सहभाग घेतला. (ETV BHARAT Reporter)
जलमय भागातून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं. (ETV BHARAT Reporter)
अग्नीशमन दलाच्या जवानांनी घरात अडकलेल्या वृद्धांना सुरक्षित ठिकाणी नेलं. (ETV BHARAT Reporter)
अग्नीशमन दलाच्या जवानांनी केवळ माणसांचेच नव्हे तर प्राण्यांचेही प्राण वाचविले. (ETV BHARAT Reporter)
खडकवासला धरणातून विसर्ग वाढल्यानं प्रशासनाकडून पूर्वकाळजी घेण्यात आली होती. (ETV BHARAT Reporter)
एकतानगरमध्ये पाण्याचे प्रमाण वाढल्यानंतर सैन्यदलाच्या जवानांनी बचावकार्य राबविले. (ETV BHARAT Reporter)
Last Updated : Aug 4, 2024, 10:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details