हैदराबाद Garlic Tea : आपल्यापैकी बहुतांश लोक दिवसाची सुरुवात चहाच्या घोटानं करतात. चहाचे वेगवेगळे प्रकार आहेत. कुणाला दुधाचा तर कुणाला ब्लॅक टी, तर काहींना ग्रीन टीची आवड आहे. परंतु आज आम्ही तुम्हाला लसणाच्या चहाचे आश्चर्यकारक फायदे सांगणार आहोत. लसूण चहाचे अनेक फायदे आहेत हा चहा रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचं काम करतो. हा चहा घेण्याचे अनेक फायदे आहेत. ज्यांची तुम्हाला कदाचित माहिती नसेल. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला लसूण चहा कसा बनवायचा आणि त्याचे आरोग्यदायी फायदे काय आहेत याची माहिती देणार आहोत.
लसूण चहा पिण्याचे 7 फायदे
आहारतज्ञ आयुष यादव यांच्या मते, लसणात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात. लसूण चहामध्ये तुम्ही आलं आणि दालचिनी देखील घालू शकता. आरोग्य लाभ दुप्पट करण्याचा आणि चहाची चव वाढवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.
- लसणाचा चहा मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे शरीरातील रक्तातील साखरेचं प्रमाणही कमी होतं. त्याचबरोबर चयापचय सुधारण्यास देखील मदत करते.
- लसणाचा चहा शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास उपयुक्त आहे.
- लसणाचा चहा वजन कमी करण्यास मदत करतो. नियमित हा चहा घेतल्यास शरीरातील बहुतांश भागांतील चरबी विरघळवण्याचं काम करतो. त्यात चयापचय गुणधर्म आहेत जे वजन कमी करण्यास मदत करतात.
- लसणाचा चहा हृदयाचं आरोग्य सुधारू शकते. रक्त परिसंचरण सुधारण्यासाठी आणि खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी लसूण चहा फायदेशीर आहे. तसंच लसनामध्ये हृदयविकार टाळण्याचे अनेक मार्ग आहेत.
- लसणाचा चहा श्वसनाचे आजार टाळू शकतो हिवाळ्यात ताप आणि खोकला बरा करण्यासाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो.
- लसणाचा चहा एक शक्तिशाली प्रतिजैविक पेय आहे. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
- लसणाचा चहा शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करते.
लसूण चहा बणवण्याची विधी ?
लसूण चहा बनवण्यासाठी तुम्ही प्रथम एक पातेलं घ्या. त्यात एक कप पाणी घाला आणि ते उकळा. थोळ्या वेळानं त्यात लसूण ठेचून घाला आणि पाच मिनिटं उकळा. पाच मिनिटांनी गॅस बंद करा आणि एका पेल्यात हा गरम चहा ओतून घ्या, अशा प्रकारे तुमचा लसूण चहा तयार आहे.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)
संदर्भ
यात दिलेली माहिती खाली देलेल्या वेबसाइटवरुण घेतली आहे