ETV Bharat / bharat

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रचारक ते पंतप्रधान पद, नरेंद्र मोदींच्या प्रगतीचा आलेख कसा उंचावला? - narendra modi birthday - NARENDRA MODI BIRTHDAY

Narendra Modi Birthday पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 74 वा वाढदिवस आहे. उत्कृष्ट वक्ते आणि भाजपामधील सर्वात मोठा आश्वासक चेहरा अशी ओळख निर्माण केलेल्या पंतप्रधान मोदींचा राजकीय प्रवास जाणून घ्या.

pm narendra modi 74th birthday
पंतप्रधान नरेंद्र मोदी वाढदिवस (source- Getty images)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 17, 2024, 7:59 AM IST

हैदराबाद Narendra Modi Birthday : पंतप्रधान मोदी यांनी आजपर्यंत तीन वेळा राज्याचे मुख्यमंत्री पद आणि तीन वेळा पंतप्रधान पदाची जबाबदारी स्वीकारली. अशी कामगिरी करणारे मोदी हे देशातील पहिले व्यक्ती ठरले आहेत. 2014 पासून पंतप्रधान पदाची भूमिका पार पाडणारे मोदी यांची सोशल मीडियात प्रचंड लोकप्रियता आहे.

नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान पदापर्यंतचा जीवन प्रवास हा राजकीय क्षेत्रातील व्यक्तींबरोबर सामान्यांसाठीही प्रेरक आहे. त्यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी उत्तर गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर या छोट्याशा शहरात झाला. स्वतंत्र भारतात जन्मलेले ते पहिले पंतप्रधान आहेत. दामोदरदास मोदी आणि हिराबा मोदी हे त्यांच्या आई-वडिलांचे नाव आहे. गरीब परिस्थितीमुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब अंदाजे 40 फूट बाय 12 फूट घरात राहत होते. आर्थिक परिस्थितीपुढे शरणागती न पत्करता ते आज देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचले आहेत.

नरेंद्र मोदींच्या आयुष्याचा थोडक्यात परिचय

  • नरेंद्र मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातमधील वडनगर गावात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.
  • 1972 मध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवकात स्वयंसेवक म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं त्यांच्या कार्याची दखल घेत 1978 मध्ये त्यांच्याकडं वडोदरा येथे विभाग प्रचारक म्हणून जबाबदारी दिली.
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं 1980 मध्ये त्यांना दक्षिण गुजरात आणि सुरत विभागासाठी प्रचारक म्हणून जबाबदारी दिली.
  • 1987 मध्ये भाजपचे सदस्य झाल्यानंतर त्यांची गुजरात युनिटचे सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली.
  • भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी 1987 मध्ये सुरू केलेल्या न्याय रथयात्रेत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
  • भारतीय जनता पक्षाने 1987 मध्ये काढलेल्या लोकशक्ती यात्रेत जवळपास ३ महिने नरेंद्र मोदी सक्रिय राहिले.
  • गुजरातमध्ये 1990 मध्ये विधानसभा निवडणुकीत 67 जागांपैकी 43 जागा जिंकल्यानंतर भाजपाला मोठे यश मिळवून दिले.
  • नरेंद्र मोदी 7 ऑक्टोबर 2001 रोजी गुजरातचे मुख्यमंत्री झाले. 22 मे 2014 पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री पद भूषवले.
  • गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत सलग 3 वेळा भाजपाला विजय मिळवून देत त्यांनी भाजपामध्ये स्वत:ची मजबूत ओळख निर्माण केली.
  • गुजरातचे मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर ते 2014 मध्ये देशाचे पंतप्रधान झाले.
  • मोदी यांनी 26 मे 2014 रोजी भारताचे 15 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
  • 30 मे 2019 रोजी नरेंद्र मोदी सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले.
  • उत्तर प्रदेशातील वाराणसी लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकीटावर ते सलग तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले.
  • 9 मे 2024 रोजी नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

नरेंद्र मोदींचे जीवन आणि शिक्षण- नरेंद्र मोदींनी कुटुंबाच्या मालकीच्या चहाच्या दुकानात काम केले. कारण कुटुंबाचा संपूर्णपणे चहाच्या दुकानावर उदरनिर्वाह चालत होता. लहानपणी त्यांना पुस्तके वाचण्याची आणि पोहण्याची खूप आवड होती. समाजात बदल घडवून आणण्याची तीव्र इच्छा त्यांना नेहमीच वाटत असे. स्वामी विवेकानंदांच्या कार्यांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. त्यांच्या विचारातून अध्यात्माच्या प्रवासाचा पाया घातला. स्वामी विवेकानंद यांचे भारताला जगतगुरू बनवण्याचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता पंतप्रधान मोदी आजही कार्यरत आहेत.

सामाजिक सेवेसाठी जीवन समर्पित- मोदींनी कुटुंबाला प्रसिद्धीपासून दूर ठेवले आहे. 1968 मध्ये त्यांचा जशोदाबेन यांच्याशी विवाह झाला होता. परंतु दोघांनीही आयुष्यभर वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. नरेंद्र मोदी यांच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी जशोदाबेन या निवृत्त शालेय शिक्षिका आहेत. त्यांना एकही मूल नाही. नरेंद्र मोदी यांनी कौटुंबिक जीवनात न अडकता सामाजिक सेवेसाठी समर्पित जीवन जगण्याचा निर्णय घेतला.

  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी दृढ संबंध- संपूर्ण देशभरात प्रवास करण्याकरिता वयाच्या 17 व्या वर्षी नरेंद्र मोदी यांनी घर सोडले. 1972 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी सामाजिक कार्याला वाहून घेतले. त्यांनी 1970 मध्ये आणीबाणीच्या काळात लोकशाही टिकविण्याकरिता चळवळीत भाग घेतला.

दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देतो. त्यांच्या नेतृत्वाखाली भारत आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. 2047 पर्यंत विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांना बळ मिळो, अशा शुभेच्छा देतो. देशाला 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था बनवण्याचा पंतप्रधान मोदींचा संकल्प आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. 21 वे शतक हे भारताचे शतक आहे. कारण देशाचे कॅप्टन पंतप्रधान मोदी आहेत. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा."

हेही वाचा-

  1. नरेंद्र मोदी, अमित शाह ते शरद पवार 'यांनी' राजकारणासोबतच गाजवलंय क्रिकेटचं मैदान - Political Interference in Cricket
  2. ....तेव्हा मी गंगेत उडी मारली होती; कैलाश खेर यांनी सांगितला किस्सा, मोदींना म्हणाले 'दैवत्वाचा आत्मा' - Kailash Kher

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.