ETV Bharat / state

जाता जाता बाप्पा पावले: मंत्रिपदाची अपेक्षा, मात्र संजय सिरसाटांच्या गळ्यात सिडकोच्या अध्यक्षपदाची माळ, हेमंत पाटील, आनंदराव अडसुळांनाही 'लॉटरी' - Sanjay Shirsat

Sanjay Shirsat : शिवसेना शिंदे गटाचे नाराज नेते आमदार संजय सिरसाट यांना सिडकोच्या अध्यक्षपदाची लॉटरी लागली आहे. माजी खासदार हेमंत पाटील यांचीही हळद संशोधन केंद्राच्या अध्यक्षपदी तर आनंदराव अडसूळ यांची राज्य अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही नियुक्ती करुन नाराजांना शांत करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा करण्यात येत आहे.

Sanjay Shirsat
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 17, 2024, 9:32 AM IST

Updated : Sep 17, 2024, 10:50 AM IST

मुंबई Sanjay Shirsat : एकीकडं राज्यात गणेशोत्सव साजरा केला जात असताना, दुसरीकडं महायुती आणि महाविकास आघाडीकडून आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी जोरदार करण्यात येत आहे. मागील कित्येक दिवसांपासून मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशी चर्चा होती. मात्र अद्यापपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. अशातच महायुतीतील अनेक नेते मंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. दरम्यान, शिवसेना आमदार संजय शिरसाट मंत्रीपदाच्या प्रतीक्षेत असताना त्यांची सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Sanjay Shirsat
आमदार संजय सिरसाट (Reporter)

आनंदराव अडसुळांची 'या' आयोगावर वर्णी : आमदार संजय शिरसाट यांची सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. याचबरोबर माजी खासदार हेमंत पाटील यांचीही हळद संशोधन केंद्राच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर दुसरीकडं शिवसेना पक्षात नाराज असलेले माजी खासदार आणि राज्यपाल पदाची आस लावून बसलेले माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांचीही राज्य अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीला केवळ एक-दीड महिन्याचा अवधी असून तर आचारसंहिता एक महिन्यानंतर लागली जाण्याची शक्यता आहे. फक्त एक महिन्यासाठीच या नाराज नेत्यांची निवड करण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

नाराजांना नेत्यांना गाजर : या महामंडळावरती केवळ शिवसेना नेत्यांचीच नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये अद्यापपर्यंत भाजपा किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची निवड करण्यात आलेली नाही. तर दुसरीकडं शिवसेनेत अनेक नेते नाराज होते. यामध्ये या निवड झालेल्या तिघांचाही समावेश आहे. मंत्रीपदाची आस लावून बसलेले आणि मंत्रीपदाच्या कित्येक दिवसांपासून प्रतीक्षेत असणारे आमदार संजय शिरसाट यांची सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आल्यानं त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जातंय. माजी खासदार हेमंत पाटील आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ हेही पक्षात नाराज होते. "लोकसभा निवडणुकीपूर्वी तुम्हाला राज्यपाल पद देण्यात येईल, असं सांगण्यात आलं होतं, असं आनंदराव अडसूळ यांनी सांगितलं." मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केवळ एक महिन्यासाठीच यांची नियुक्ती करुन या नाराज नेत्यांचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या निवडीतून नाराज तूर्तास तरी शांत बसतील, नाराज नेत्यांना एक महिन्याचं गाजर दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. नाराजांची तोंड बंद करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला असल्याची चर्चा सध्या करण्यात येत आहे.

हेही वाचा :

  1. Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांची शिंदे सरकारमधे कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता
  2. Sanjay Sirsat संजय शिरसाटांचे शिंदे गटात बंड उद्धव ठाकरेंना संबोधलं कुटुंबप्रमुख
  3. Sanjay Shirsat Criticized Shushma Andhare: सुषमा अंधारे विषय माझ्यासाठी संपला - संजय शिरसाट

Last Updated : Sep 17, 2024, 10:50 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.