नुसरत भरुचाला 'प्यार का पंचनामा' या चित्रपटासाठी ओळखले जाते.. नुसरतनं आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही इंडस्ट्रीतून केली होती.. ती 2002 मध्ये झी टीव्हीवरच्या 'किटी पार्टी' या मालिकेत दिसली होती.. यानंतर ती सोनी टीव्हीवरील 'सेव्हन' या मालिकेत मुख्य भूमिकेत होती.. टीव्ही सीरियल्समध्ये काम केल्यानंतर नुसरतला 2006 मध्ये 'जय संतोषी मां' चित्रपट मिळाला.. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही कमाल करू शकला नाही.2009 मध्ये नुसरतचा दुसरा चित्रपट 'कल किसने देखा है' आला.. तिचा 'कल किसने देखा है' हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला.. 2010 मध्ये ती 'लव्ह सेक्स और धोखा'मध्ये दिसली होती. तिचा हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता.. हिंदी चित्रपटसृष्टीत करिअर फ्लॉप होताना पाहून नुसरतनं 2010 मध्ये 'ताजमहाल' या चित्रपटाद्वारे तेलुगू इंडस्ट्रीत पदार्पण केलं.. नुसरत भरुचाच्या करिअरमध्ये नवीन वळण आलं. जेव्हा तिनं 2011 मध्ये 'प्यार का पंचनामा' चित्रपटात कार्तिक आर्यनबरोबर काम केलं.. 'प्यार का पंचनामा'ला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आणि यासोबतच नुसरतच्या करिअरलाही नवी दिशा मिळाली.. नुसरतनं कार्तिक आर्यनसोबरोबर 'प्यार का पंचनामा 2'मध्ये काम केलंय.