महाराष्ट्र

maharashtra

मान्सूनच्या हंगामात लावा सुंदर फुलांची झाडे - monsoon flowers

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 2, 2024, 6:01 PM IST

मान्सूनचा हंगाम भारतात दाखल झाला आहे, आता उष्णतेपासून सर्वांची सुटका झाली आहे. यावर्षी उन्हाळ्यामध्ये हवेत खूप उष्णता होती. दरम्यान पावसाळ्यात नैसर्गिक सौंदर्य वाढवायचे असेल तर तुम्ही तुमच्या फुललेल्या बागेत काही सुंदर फुलांची झाडे लावू शकता, यामुळे तुमच्या गार्डनचं सौंदर्य खूप वाढेल. (ANI- photo)
झेंडूची चमकदार फुले बागांमध्ये अनेकदा दिसून येतात. या फुलाचं बी तुम्ही लावलं तर, दोन महिन्यांनी तुमची बाग उजळून निघेल. (ANI- photo)
अपराजिता वनस्पती, ज्याला बटरफ्लाय पी म्हणून ओळखले जाते. या वेलीला खूप सुंदर फुले येतात. हा वेल तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये एका कुंडीत लावल्यानं लवकर पसरेल. (ANI- photo)
चमेली या फुलामधून खूप सुंदर सुगंध येतो. पावसाळ्यात चमेलीच्या वेलीला खूप फुले येतात, म्हणून हा वेल पावसाळ्यात तुमच्या घराच्या गेटजवळ तुम्ही लावा. (ANI- photo)
कॉसमॉस फ्लॉवर हे जास्त जंगलामध्ये दिसते, मात्र तुम्ही जर हे झाड घरी लावले तर तुमच्या गार्डनची नक्की शोभा वाढवेल. (ANI- photo)
चाफा सुगंधित फूल आहे. चाफ्याच्या अनेक जाती आहेत. हे फूल दिसायला खूप आकर्षक दिसते, त्यामुळे या फुलाचं झाड नक्की लावून पाहा... (ANI- photo)

ABOUT THE AUTHOR

...view details