महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / photos

रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानीचा गोव्यात पार पडला भव्य विवाह सोहळा - रकुल आणि जॅकी भगनानीचे फोटो

अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि अभिनेता जॅकी भगनानी यांचा विवाह सोहळा 21 फेब्रुवारीला आयटीसी ( ITC) साउथ गोवामध्ये पार पडला आहे. या समारंभात अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. आता या लग्नामधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 22, 2024, 12:01 PM IST

अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि अभिनेता जॅकी भगनानी यांचा विवाह सोहळा पार पडला आहे.
21 फेब्रुवारीला झालेलं लग्न आयटीसी ( ITC) साउथ गोवा येथे झालं असून या समारंभात अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.
रकुलनं लग्नासाठी गुलाबी रंगाचा लेहेंगा निवडला होता, तर जॅकीनं ऑफ-व्हाइट शेरवानी परिधान केली होती.
रकुल आणि जॅकीचं लग्न आनंद कारज आणि सिंधी पद्धतीनं झालं आहे.
रकुल आणि जॅकीनं 2020मध्ये एकमेकांना डेट करणं सुरू केलं होत.
त्यानंतर या जोडप्यानं 2021 मध्ये त्यांचं नात अधिकृत केलं.
रकुल प्रीत सिंग आणि अभिनेता जॅकी भगनानी परदेशात लग्नाची योजना आखत होते.
मात्र या जोडप्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शब्दांना मान देऊन त्यांची योजना बदलली.
या लग्नात अनन्या पांडे, आदित्य रॉय कपूर, शाहिद कपूर-मीरा राजपूत, भूमी पेडणेकर, वरुण धवन-नताशा, शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा, आयुष्मान खुराना-ताहिरा कश्यप यांच्यासह बॉलिवूड सेलिब्रिटी हजर होते.
रकुल आणि जॅकीनं त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत.
या जोडप्याच्या फोटोवर अनेकजण त्यांना लग्नाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.
रकुल आणि जॅकी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details