महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / photos

दिवंगत गुरु दत्त यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्यांच्या पाच चित्रपटांबद्दल... - guru dutts birth anniversary

भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक दिवंगत गुरु दत्त यांचा आज 9 जुलै रोजी वाढदिवस आहे. आपल्या चित्रपटातून त्यांनी कला क्षेत्रात अमिट छाप सोडली आहे. सिनेसृष्टीत त्याचं योगदान खूप मोठ असून त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. आज आम्ही तुम्हाला त्याच्या काही विशेष चित्रपटाबद्दल सांगणार आहोत. (ANI -Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 9, 2024, 6:07 PM IST

'प्यासा' हा चित्रपट 1957मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन गुरु दत्त यांनी केलं होतं. या चित्रपटात सामाजिक ढोंगीपणाचे चित्रण विशेष पद्धतीनं मांडले आहे. (ANI -Photo)
'कागज के फूल' हा चित्रपट 1959मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात स्टारडम आणि वैयक्तिक बलिदानाच्या गुंतागुंतीची कहाणी दाखवली गेली आहे. (ANI -Photo)
'साहिब बीबी और गुलाम' सामंतवाद बंगालच्या पार्श्वभूमीवर असलेला हा चित्रपट खूप लोकप्रिय झाला होता. याचं प्रदर्शन 1962मध्ये झालं होतं. (ANI -Photo)
'आर पार' चित्रपट 1954मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील संवाद खूप लोकप्रिय झाले आहेत. गुरू दत्त यांचा उत्कृष्ट चित्रपट आहे. (ANI -Photo)
'मिस्टर आणि मिसेस 55' 1955मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात रोमँटिक कॉमेडी आहे, त्यामुळे हा चित्रपट खूप लोकप्रिय झाला होता. (ANI -Photo)

ABOUT THE AUTHOR

...view details