'धर्मवीर 2' चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.. प्रवीण तरडे दिग्दर्शित या चित्रपटात प्रसाद ओक आणि क्षितिज दाते हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.. आनंद दिघेंच्या मृत्यूचं गूढ. एकनाथ शिंदेंच्या बंडाची गोष्ट अशा अनेक गोष्टी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.. या ट्रेलर प्रदर्शित सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावली होती.. ट्रेलर प्रदर्शित सोहळ्याला अभिनेता सलमान खान देखील उपस्थित राहिला.. दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे'चा हा चित्रपट सीक्वल आहे.. 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती.. 'धर्मवीर 2' या चित्रपटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील भूमिका साकारल्याचं म्हटलं जातंय.. ऑगस्ट महिन्यात 'धर्मवीर 2' हा चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.