दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत टी-20 विश्वजेतेपद जिंकलं. भारतीय संघाचं मुंबईत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं.. मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम अशी क्रिकेट संघाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी क्रिकेटप्रेमींची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली.. विजयी मिरवणूकीला रात्री 8 वाजता सुरुवात झाली. जवळपास अर्धा ते पाऊणतास ही विजय मिरवणूक काढण्यात आली.. ओपन डेक बसमधून मिरवणूक काढण्यात आली.. विजयी मिरवणुकीला कोणतीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात मुंबई पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.. वानखेडेवर जय शाह यांनी भारतीय खेळाडुंना 125 कोटींचा चेक सुपूर्द केला. यावेळी कर्णधार रोहित शर्मा. विराट कोहली. राहुल द्रविड यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.. अखेरच्या क्षणांमध्ये विराट कोहलीनं वर्ल्ड कप हातात घेतल्याचे पाहायला मिळालं.. वानखेडे स्टेडियममध्ये भारतीय खेळाडूंनी विजयी फेरीही मारली. त्यावेळी चाहत्यांनी भारतीय संघाचं जोरदार स्वागत केलं.. रोहित शर्मा. सूर्यकुमार यादव. विराट कोहली. ऋषभ पंत. अर्शदीप सिंग. हार्दिक पांड्या यांनी वानखेडेवर ठेका धरला.. ढोल-ताश्यांच्या गजरात जबरदस्त ठेका धरत भारतीय खेळाडूंनी वानखेडे स्टेडियम गाजवलं.