महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / opinion

राज्यसभा निवडणूक निकालाचा भाजपाला लोकसभा निवडणुकीत होणार फायदा?

राज्यसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशमध्ये झालेला पराभव काँग्रेसला अधिक दुखावणारा आहे. खरंतर हा पराभव काँग्रेसला सहज टाळता आला असता. परंतु काँग्रेस हायकमांडनं लक्ष न दिल्यानं काँग्रेसच्या सहा आमदारांनी बंड करत भाजपाला मतदान केलंय. याबाबत हिमाचल प्रदेशातील एका वरिष्ठ नेत्यानं पक्षाच्या हायकमांडला इशारा दिला होता. मात्र, हायकमांडनं त्याकडं दुर्लक्ष केलं. याबाबत वीरेंद्र कपूर यांनी विश्लेषण केलंय.

RS Election Result
RS Election Result

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 5, 2024, 1:41 PM IST

हैद्राबाद : गेल्या आठवड्यात राज्यसभेची निवडणूक पार पडली. त्यात हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसच्या सहा आमदारांनी पक्षाच्या विरोधात भाजपाला मतदान केलं. त्यामुळं काँग्रेसचे उमेदवार अभिषेक मनु सिंघवी यांचा पराभव झाला. तसंच उत्तर प्रदेशात काँग्रेससह समाजवादी पक्षाला एक किंवा दोन जागा जिंकण्याची एकमेव आशा होती. मात्र, तिथंही अर्धा डझन आमदारांनी उमेदवाराच्या विरोधात मतदान केल्यानं भाजपाला अतिरिक्त जागा मिळून काँग्रेसला मोठा धक्का बसलाय.

हिमाचल प्रदेशाकडे काँग्रेस हायकमांडचं दुर्लक्ष : मात्र, हिमाचल प्रदेशात झालेला पराभव काँग्रेससाठी अधिक डोकेदुखी ठरणारा आहे. कारण या ठिकाणी काँग्रेसला सहज घोडेबाजर टाळता आला असता. मात्र, हिमाचल प्रदेशातील एका वरिष्ठ नेत्यानं इशारा देऊनही काँग्रेस हायकमांडनं त्याकडं लक्ष दिलं नाही. पक्षाचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मांनी हिमाचल प्रदेशमधून बाहेरच्या व्यक्तीच्या उमेदवारीला विरोध केला होता. याआधी देखील हिमाचल प्रदेशचा उमेदवार सोडून बाहेरच्या व्यक्तीची निवड करण्यास भाग पाडलं नव्हतं. सिंघवी यांच्या उमेदवारीविरोधात पक्षाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याचं आनंद शर्मा यांनी त्यावेळी सांगितलं होतं.

मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखूंना विरोध : मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांना सिमल्यात काँग्रेस विधिमंडळ पक्षात नाराजीचा सामना करावा लागला हे उघड गुपित आहे. चौदा महिन्यांपूर्वी, काँग्रेस हायकमांडनं त्यांना मुख्यमंत्रिपदासाठी नामांकन दिलं होतं, तेव्हा आमदारांच्या एका वर्गानं त्यांना विरोध केला होता. कारण प्रतिभा सिंह, मंत्री वीरभद्र सिंह किंवा त्यांचा मुलगा विक्रमादित्य सिंह यांना मुख्यमंत्री केलं जाईल, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, काँग्रेस हायकमांडनं त्यांना फटकारल्यामुळं प्रकरण शांत झालं होतं.

भाजपाचे हर्ष महाजन विजयी : त्यामुळं सखू यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून त्यांना आमदारांच्या असंतोषाचा सामना करावा लागला. त्यामुळं आमदारांना त्यांच्याविरोधात संधी मिळताच त्यांनी पक्षाविरोधात बंड करत भाजपाला मतदान केलं. यावेळी काँग्रेसच्या पक्षाच्या सहा आमदारांनी पक्षाचा व्हिप झुगारून सिंघवी विरोधात मतदान केलं होतं. त्यामुळे भाजपाचे खासदार राज्यसभेत निवडून गेले. नुकतेच भाजपामध्ये दाखल झालेले माजी काँग्रेसचे हर्ष महाजन तसंच सिंघवी यांना प्रत्येकी 34 मते पडली. त्यानंतर ड्रॉद्वारे विजेता विजेत्याचं नाव घोषित करण्यात आलं. निवडणूक आयोगानं विहित केलेल्या पद्धतीनुसार ड्रॉ काढण्यात आला. त्यात भाजपा उमेदवार हर्ष महाजन विजयी झाले.

सहा काँग्रेस आमदारांची हकालपट्टी :68 सदस्यीय हिमाचल प्रदेश विधानसभेत सत्ताधारी पक्षाचे 40 आमदार, विरोधी पक्ष भाजपाचे 25, तर तीन अपक्ष आमदार आहेत. काँग्रेसच्या सहा सदस्यांनी पक्षाचा व्हिप झुगारून तीन अपक्षांसह भाजपाच्या उमेदवाराला मतदान केलं. त्यामुळं उमेदवारांना 34 मते मिळाली. त्यामुळं सुखू सरकारची पोलखोल झाली. निवडणुकीच्या एका दिवसानंतर, विधानसभेची बैठक झाली तेव्हा, भाजपाच्या 15 आमदारांना निलंबित करण्यात आलं. त्यानंतर आवाजी मतदानानं अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. काँग्रेस पक्षातील संकट दूर करण्यासाठी केंद्रीय निरीक्षकांचा एक गट शिमला येथे रवाना झाला. विधानसभेच्या अध्यक्षांनी एका प्रस्तावावर क्रॉस व्होटिंग केलेल्या सहा काँग्रेस आमदारांची हकालपट्टी केली. प्रतिभा सिंह यांचे पुत्र आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी सरकारमधून राजीनामा देण्याची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी आपल्याला काम करू दिलं नाही, असं सुचवून आपला अपमान झाल्याचं ते म्हणाले.

सुखू सरकार पाडण्याचा भाजपावर आरोप : काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी भाजपावर सुखू सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. त्यामुळं भाजपाकडं अशी बोटे दाखवणं निरर्थक होतं. जेव्हा राज्यसभेच्या मतदानाच्या काही दिवस आधी पक्षाचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी बाहेरच्या व्यक्तीच्या नामनिर्देशनाविरुद्ध उघडपणे इशारा दिला होता. प्रतिभा सिंह किंवा त्यांच्या मुलाच्या मुख्यमंत्रिपदाच्या दाव्याकडे दुर्लक्ष करून सखू यांना मुख्यमंत्रीपदी नियुक्त करण्यात आलं. या दोघांनी अनेक वेळा काँग्रेसचा विजय दिवंगत राजा वीरभद्र सिंह यांच्या लोकप्रियतेमुळं झाल्याचं सांगितलं होतं.

काँग्रेस विजयी होण्याची शक्यता कमी : हिमाचल प्रदेशातील विधानसभेतील अनिश्चित आमदारांची संख्या लक्षात घेता, हिमाचलमधील काँग्रेस सरकार आता सुरक्षित दिसंत नाहीय. सार्वजनिक बांधकाम मंत्रिपदाचा राजीनामा मागे घेण्यासाठी काँग्रेसनं विक्रमादित्य सिंह यांना विनंती केली असली तरी, सरकार कधीही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोदींची लोकप्रियता लक्षात घेता, विभाजित काँग्रेसला राज्यातील एकूण चारपैकी एकही जागा लोकसभेत जिंकता आली तर हा चमत्कारच ठरेल.

काँग्रेस पक्षाच्या अडचणी वाढल्या : त्याचवेळी उत्तर प्रदेशमधील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस रिंगणात नसली तरी, समाजवादी पक्षाला बसलेल्या धक्क्याचा लोकसभा निवडणुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहेा. समाजवादी पक्षाबरोबर जागावाटपाचा काँग्रेसचा प्रश्न मिटला आहे. त्यामुळं उत्तर प्रदेशात काँग्रेस 17 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर, समाजवादी पक्ष 63 जागा लोकसभेची निवडणूक लढवणार आहे. मात्र, यात समाजपादी पक्षाच्या सात आमदारांनी राज्यसभा निवडणुकीत भाजपा उमेदवाराला मतदान केलं होतं. त्यामुळं पक्षाची स्थिती आणखी कमकुवत होताना दिसत आहे. लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार, विशेषतः गांधी घराण्याच्या बालेकिल्ल्या असलेल्या अमेठी, रायबरेली मतदारसंघात काँग्रेसला मोठा संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे. कारण सपाचे बंडखोर आमदार अमेठी-रायबरेली मतदार संघातील आहेत. त्यामुळं काँग्रेस पक्षाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अखिलेश यादव यांच्यावर यादव नाराज : अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्यापासून रोखल्याबद्दल आमदार अखिलेश यादव यांच्या विरोधात तक्रार करत होते. अयोध्या समारंभाला उपस्थित राहिल्यानं मुस्लिम व्होटबँकला विरोध करेल, या भीतीनं अखिलेश यादव यांनी उपस्थित राहणं टाळलं होतं. अयोध्या मंदिराच्या सोहळ्याला अखिलेश यादव उपस्थित न राहिल्यामुळं सपाला ठामपणे पाठिंबा देणारी यादव जातही अखिलेश यांच्यावर नाराज आहे.

सपा आमदारांचं पक्षाविरुद्ध बंड : सपा गटातील ताणतणामुळं इंडिया आघाडीसाठी देखील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सपा आणखी कमकुवत झाल्यास सपा- काँग्रेस जागावाटप युती थांबवता येणार नाही. तसंच, जर गांधींनी अमेठी-रायबरेलीमधून निवडणूक लढवल्यास त्यांना सपाच्या पाठिंब्याची गरज असणार आहे. परंतु, उत्तर प्रदेशातील सपा आमदारांनी पक्षाविरुद्ध बंड केलं आहे. त्यामुळं गांधी घराण्याच्या बालेकिल्ल्यांमध्ये गांधींना धोकादायक स्थिती निर्माण झालीय.

आगामी निवडणुकीत काँग्रेसचं काय होणार? : केरळमधील डाव्या आघाडीनं राहुल गांधींच्या ताब्यात असलेल्या वायनाड लोकसभेवर दावा केल्यामुळं सोनिया गांधी यांनी राज्यसभेतून संसदेत निवडून गेल्या आहेत. त्यामुळं गांधी कुटुंब अमेठी किंवा रायबरेलीत धोका पत्कराण्याऐवजी यावेळेस तेलंगणातील सुरक्षित जागा उमेदवारीसाठी निवडू शक्यता. सध्या राहुल गांधी यांची 'भारत जोडो' यात्रा देशात सरू आहे. मात्र, या यात्रेमुलं विरोधकांच्या मनोबलात फारसा परिणाम होण्याची शक्यता दिसत नाहीय. उत्तर प्रदेश तसंच हिमाच प्रदेशात सपामध्ये काँग्रेसला मिळालेल्या धक्क्यामुळं पुढील लोकसभा निवडणुकीत काय होणार याची पूर्वकल्पना देत आहेत. त्यातच, राहुल गांधी यांची यात्रेकडं फारसं लक्ष जाताना दिसत नाही. त्यामुळं येणारा काळ काँग्रेस पक्षासाठी महत्त्वाचा असणार आहे.

हे वाचलंत का :

  1. भारतातील रस्ते हरित करणं गरजेचं : ट्रकच्या मार्गावर शून्य उत्सर्जन करणं का आहे महत्वाचं, जाणून घ्या
  2. भारताचे पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान मोरारजी देसाई, महाराष्ट्र विरोधी म्हणून नेहमीच झाली संभावना
  3. संघर्षात सामंजस्य निर्माण करण्यासाठीचा उपाय 'मध्यस्थी कायदा'; वाचा मध्यस्थी कायद्याची व्यापकता आणि मर्यादा

ABOUT THE AUTHOR

...view details