कोलकाता :Small Tea Growers : लहान चहा उत्पादक भारतीय चहा उद्योगात मोठ्या प्रमाणात सहभाग घेत असून ते एक शक्ती बनत असल्याचं समोर आलं आहे. 2023 मध्ये, आसाम, पश्चिम बंगाल आणि दक्षिण भारतातील लहान चहा उत्पादकांनी देशाच्या एकूण 1,367 दशलक्ष किलो चहा उत्पादनात तब्बल 53 टक्के योगदान दिलं आहे. भारतीय स्मॉल टी ग्रोअर्स असोसिएशनचे अध्यक्ष बिजॉय गोपाल चक्रवर्ती म्हणाले, 'आम्हाला आशा आहे की सरकार लवकरच चहा उत्पादकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) जाहीर करतील. दरम्यान, ताग शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कच्च्या तागासाठी एमएसपी आधीच जाहीर केला आहे असंही ते म्हणाले आहेत.
प्रोत्साहन योजनेंतर्गत चहा क्षेत्राला आर्थिक सहाय्य : लहान चहा उत्पादनात वाढ झाल्याने आसाम आणि पश्चिम बंगालमधील उद्योजकतेलाही चालना मिळाली आहे. आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील 25 वर्षीय बिमल गोगोई म्हणाले, 'मी माझ्या कुटुंबाच्या एक एकर जमिनीवर चहा पिकवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे मला माझ्या उपजीविकेचा एक मार्ग उपलब्ध झाला आहे.' तसंच, सरकारने चहा विकास आणि प्रोत्साहन योजनेंतर्गत चहा क्षेत्राला आर्थिक सहाय्य जाहीर केल्यामुळं लहान चहा उत्पादकांना अलीकडेच मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेत पुढील दोन आर्थिक वर्षांसाठी (2024-25 आणि 2025-26) 290.81 कोटी रुपयांवरून 528.97 कोटी रुपयांचं वाटप 82 टक्क्यांनी वाढवलं आहे.
उत्पादकांची व्याप्ती 1,000 वरून 30,000 पेक्षा जास्त : चहा विकास आणि प्रोत्साहन या योजनेंतर्गत, लहान चहा उत्पादकांना अनेक प्रकारचे प्रोत्साहन मिळणार आहे आणि संबंधित अधिकारी त्यांना स्वयं-सहायता गट (SHGs) आणि शेतकरी उत्पादक संस्था (FPOs) मध्ये एकत्रीत करण्याचा विचार करत आहेत. पुढील दोन आर्थिक वर्षांमध्ये, 40 बचत गट आणि आठ FPO च्या तुलनेत 105.5 कोटी रुपयांच्या वाढीव सहाय्याने 800 SHGs आणि 330 FPOs स्थापन करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे, जे आधी 2.7 कोटी रुपयांच्या सहाय्याने नियोजित होतं. दरम्यान, सरकारच्या या योजनांमुळे पुढील दोन वर्षांत लहान चहा उत्पादकांची व्याप्ती 1,000 वरून 30,000 पेक्षा जास्त वाढण्याची अपेक्षा आहे.
'चहा उत्पादकांना खूप आवश्यक पाठिंबा मिळायला हवा' : शेतातील यांत्रिकीकरण उपकरणं, लीफ कॅरीज वाहनं, लीफ शेड, छाटणी मशीन, यांत्रिक कापणी यंत्रे आणि साठवण गोदामे यासारख्या सामान्य सुविधा पुरवणं हे उत्पादनाचं उद्धीष्ट आहे. या व्यतिरिक्त, लहान चहा उत्पादकांना खूप आवश्यक पाठिंबा मिळायला हवा, जेणेकरुन उत्पादकांना ऑर्थोडॉक्स, ग्रीन आणि स्पेशॅलिटी चहाच्या उत्पादनासाठी SHGs/FPOs द्वारे नवीन मिनी-टी युनिट्सची स्थापना करता येऊ शकेल.