हैदराबाद NDA Win Lok Sabha Election :लोकसभा निवडणुकीत यंदा भाजपानं 400 पार चा निश्चय केला होता. मात्र, प्रत्यक्ष निकालात त्यांना केवळ 240 जागा मिळाल्या. त्यामुळं सर्वांना त्यांचा पराभव झाला असं वाटू लागलं. पण खरं तर याकडंही आपण लक्ष द्यायला हवं की, त्यांच्या प्रतिस्पर्धी असलेल्या कॉंग्रेसला केवळ 99 जागाच मिळाल्या. मात्र, तरीही भाजपात नाराजीचं वातावरण पाहायला मिळालं. कारण, भाजपा केवळ आपल्या 400 पारच्या स्वप्नापासूनच नाही तर 272 च्या जादूई बहुमताच्या आकड्यापर्यंत देखील पोहोचू शकली नाही. त्यामुळं तुम्ही विचाराल की राहुल गांधी निवडणूक जिंकल्यासारखं का फिरताय. अर्थातच भाजपाला बहुमत नाकारण्याचं माफक उद्दिष्ट त्यांनी ठेवलं नव्हतं. ते या मर्यादित मिशनमध्ये यशाचा दावा करू शकतात. तरीही ते मोदींना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यापासून रोखू शकले नाहीत. ही काही छोटी गोष्ट नाही. कारण, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी शपथ घेतलेले एकमेव पंतप्रधान होते.
चला तर मग आपण याविषयी सोप्या भाषेत समजून घेऊया. 2024 च्या निवडणुकीचे निकाल पाहता राहुल गांधींना अजून एक उदाहरण हवे असेल तर त्यांनी या उदाहरणाचा क्रिकेट जगतात विचार करायला हवा. समजा विराट कोहलीनं जर सलग तीन सामन्यांमध्ये शतकं झळकावण्याचं जाहीरपणे वचन दिलं. पण लागोपाठ दोन शतकांनंतर तिसऱ्या सामन्यात दहा किंवा त्याहून अधिक धावांनी तीन आकडी धावसंख्या गमावली. तर त्याला पराभूत, निरुपयोगी फलंदाज म्हणता येईल का? उत्तर स्पष्ट आहे.
400 पारच्या घोषणांनी भाजपाच्या प्रचाराला मोठा फटका बसला. कारण मोदींना 400 जागा हव्या आहेत असा प्रचार करण्याची काँग्रेसला संधी मिळाली. तसंच 400 पार केल्यावर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान रद्द करू शकतील आणि अनुसूचित जाती-जमाती (एससी आणि एसटी) आणि इतर मागास जातींचे आरक्षण बंद करू शकतील, असे आरोप कॉंग्रेसकडून करण्यात आले. या प्रचारामुळं यूपीमधील दलितांच्या एका मोठ्या वर्गानं भाजपाकडे पाठ फिरवली, त्यामुळं त्यांनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाला मतं दिलं.
यंदा भाजपाला 400 पार करण्यापासून रोखण्यासाठी 20 टक्के मुस्लिम, भाजपाच्या विरोधात एकवटल्याचं बघायला मिळालं. मात्र, प्रचारादरम्यान ही बाब लक्षात येताच भाजपानं कॉंग्रेसवर आरोप करण्यास सुरुवात केली. काँग्रेसला एससी-एसटी आणि ओबीसी आरक्षण रद्द करून त्याऐवजी मुस्लिमांना आरक्षण द्यायचंय, अशी टीका मोदी सरकारच्या नेत्यांकडून करण्यात आली.
मात्र, प्रत्यक्षात मुस्लिमविरोधी वक्तव्यांनी भाजपाच्या विरोधात मतदान करण्याचा मुस्लिमांचा हेतू अजून मजबूत झाला. मौलवी, मुल्ला आणि इतर समाजाच्या नेत्यांच्या चिथावणीला प्रत्युत्तर देत मुस्लिमांनी संघटित होऊन भाजपाचा पराभव करण्यासाठी मतदान केलं. यूपीमध्ये त्यांनी बसपा किंवा इतर गटांनी उभ्या केलेल्या कमकुवत मुस्लिम उमेदवारांना मतदान करून त्यांची मते वाया घालवली नाहीत. मुस्लिमांचं असं एकत्रीकरण होतं की, आसामचे मुख्यमंत्री हेमंत सरमा यांच्यासारखे मोठे नेतेही लोकसभेच्या तीन जागांवर भाजपाच्या उमेदवारांना पराभूत करण्यात मुस्लिम मतदारांच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करत होते. तसंच लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्या भवितव्याचा विचार केला तर 90 च्या दशकाच्या उत्तरार्धापासून ते पश्चिम बंगालमधील बेहरामपूर मतदारसंघातून विजयी होते. मात्र, यावेळी ते गुजरातचा माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणकडून पराभूत झाले. या मतदारसंघात 52 टक्के मुस्लिम आहेत. 70,000 पेक्षा जास्त मतांनी पराभूत झाल्यानंतर चौधरी म्हणाले, "मी तीस वर्षे बेहरामपूरसाठी माझं रक्त आणि घाम गाळून काम केलय. पण मी काय करू शकतो? मी माझा पराभव स्वीकारतो, मुस्लिमांनी पठाणला मतदान केलं, गुजरातच्या एका मुस्लिमाने चौधरीला पाडले."