हैदराबाद Israel Hamas War : इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये मागील काही काळापासून युद्ध सुरू आहे. या युद्धात युनोचे अधिकारी तथा भारताचे सुपूत्र वैभव काळे यांना विरमरण आलं. मात्र अद्यापही युद्ध थांबण्याचं नाव घेत नाही. मात्र आता यावर आंतरराष्ट्रीय न्यायालय (ICJ) नं इस्रायलला दक्षिण गाझात असलेल्या रफाहमधील सैन्य दलाचा हल्ला तत्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत. इस्रायली संरक्षण दलांनी मे महिन्याच्या सुरुवातीपासून पॅलेस्टाईनला वेढा घातला. गेल्या सहा महिन्यात इस्रायलनं गाझाच्या उत्तरेकडील भागात अनेक हल्ले केले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय न्यायालयानं ICJ हा आदेश जारी केला. या आदेशामागं दक्षिण आफ्रिकेनं इस्रायलवर 1948 च्या कराराचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे. यामध्ये UN चे सर्व सदस्य देश पक्ष आहेत. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे ICJ आदेश कायदेशीररित्या बंधनकारक आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सुरक्षा परिषदेनं ठराव पास करणं आवश्यक आहे.
आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार नरसंहार हा सगळ्यात मोठा गुन्हा :"आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार नरसंहार करणं हा सर्वात गंभीर गुन्हा आहे. मात्र नरसंहार होतो की नाही, याबाबतचे पुरावे आणि साक्ष तपासण्यास न्यायालयाला अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचायला अनेक वर्षे लागतील. त्या अगोदर गाझामध्ये इस्रायलकडून होणारे हल्ले रोखण्यासाठी तात्पुरत्या मात्र कठोर उपाययोजना करणं गरजेचं आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय न्यायालयानं ICJ इस्रायलचे हल्ले गाझातील पॅलेस्टाईन गटावर परिणाम करू शकतात. त्यामुळे पॅलेस्टाईनचा भौतिक विनाश होऊ शकतो. हा विनाश थांबवावा. इस्रायल नरसंहार करत आहे. त्यामुळे तो थाबला पाहिजे."
इस्रायलनं आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केलं :इस्रायलनं गाझाला मानवतावादी मदत देण्याच्या न्यायालयाच्या या आधीच्या आदेशाचं उल्लंघन केलं आहे, असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. इस्रायलनं या प्रदेशातून बाहेर काढलेल्या 8 लाख पॅलेस्टाईन नागरिकांना सुरक्षा, पुरेसं अन्न, औषध आणि निवारा देत असल्याची माहिती न्यायालयाला दिली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाला नरसंहाराच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या कोणत्याही चौकसी आयोगाला परवानगी देण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयानं हमासनं ठेवलेल्या ओलिसांच्या सुटकेबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांची तत्काळ आणि बिनशर्त सुटका करण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयानं 26 जानोवारीला दक्षिण आफ्रिका आणि इस्रायल या दोन्ही बाजुंचे युक्तीवाद ऐकल्यानंतर तात्पुरत्या उपाययोजनांना दुजोरा दिला. त्यानंतर पुन्हा 26 मार्चला आंतरराष्ट्रीय न्यायालयानं इस्रायलला तात्पुरत्या उपाययोजना अंमलात आणण्याचं आवाहन केलं. गाझामध्ये नागरिकांची परिस्थिती आणखी खालावल्यानं न्यायालयानं हे आवाहन केलं. इस्रायल आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करत असल्याचं उघड होत आहे. इस्रायलनं आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या ( ICC ) हस्तक्षेपाला अगोदरचं नाकारलं आहे.