महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / opinion

अमेरिकेत क्रिकेटला उर्जितावस्थेत आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशाची गुंतवणूक - cricket in America - CRICKET IN AMERICA

cricket in America अमेरिकेत सध्या क्रिकेटचा फीवर वाढण्याची शक्यता आहे. क्रिकेटसाठी मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित लोक, तसंच ICC द्वारे लीग स्पर्धांच्याकरता मोठ्या प्रमाणात पैशाची गुंतवणूक होत आहे. अमेरिकेत क्रिकेटला रॉकस्टार बनवण्यासाठी कठोर परिश्रम घेतले जात आहेत. यासंदर्भात मीनाक्षी राव यांचा विशेष लेख.

अमेरिकेत क्रिकेट
अमेरिकेत क्रिकेट

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 27, 2024, 1:14 PM IST

हैदराबाद cricket in America-जून महिन्यात अमेरिकेत क्रिकेटचा मोठा इव्हेंट होत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) द्वारे या स्पर्धांच्यासाठी तयारी करण्यात येत आहे. यासाठी सगळेच कामाला लागले आहेत. नृत्य, संगीत, बिअर आणि भरपूर खाण्याचे पदार्थ यासह क्रिकेटची मेजवानी अमेरिकन लोकांना यामधून मिळणार आहे. क्रिकेट फीवरसाठी अमेरिकेत आतापासूनच वातावरण निर्मिती करण्यात येत आहे. सध्या ज्या लोकांना क्रिकेटची आवड आहे, ते भरमसाठ पैसे मोजून क्रिकेट स्ट्रीमिंग सॅटेलाइट टीव्हीवर आंतरराष्ट्रीय सामने पाहतात. त्यांच्यासाठी ही पर्वणी असणार आहे.

आता या नवीन लीगमध्ये खेळाडू कोण असतील, प्रेक्षक कोण येतील, क्रिकेटर वेस्ट इंडियन, भारतीय, पाकिस्तानी आणि इतर दक्षिण आशियाई स्थलांतरित असतील का, यासंदर्भात विचारणा होऊ लागली आहे. प्रामुख्याने टेक्सास, न्यूयॉर्क आणि फ्लोरिडामध्ये क्रिकेटची क्रेझ पाहायला मिळणार आहे. अमेरिकन क्रिकेटमध्ये 2023 मध्ये मेजर क्रिकेट लीगच्या स्थापनेपूर्वी आणि त्याच्या सहा संघांना खेळाचे औपचारिक प्रशिक्षण मिळालेल्या दिवसांपासून फारसा बदल झालेला नाही. मात्र येणाऱ्या वर्ल्ड कपने खूपच फरक पडेल अशी अपेक्षा आहे.

जूनमध्ये सुरू होणारा T20 विश्वचषक ग्रुप स्टेजच्या सामन्यांसाठी यूएसमध्ये आयोजित केला जाईल. त्यानंतर तो अटलांटिकच्या पलीकडे वेस्ट इंडियन्सकडे जाईल. न्यू यॉर्क, टेक्सास आणि फ्लोरिडा ही अमेरिकेतील तीन मुख्य ठिकाणे आहेत, जिथे स्थलांतरितांची संख्या जास्त आहे. त्यातील लोकांना क्रिकेट अधिक आवडतो. भारत, पाकिस्तान आणि कॅरिबियन सारख्या क्रिकेटप्रेमी राष्ट्रांमधून स्थलांतरित होण्याच्या वाढीमुळे अमेरिकेत क्रिकेटच्या वाढीला चालना मिळाली आहे.

खेळाच्या गुंतागुंतीशी परिचित असलेला तयार चाहता वर्ग, स्पर्धात्मक क्रिकेटच्या भरभराटीसाठी तयार झाला आहे. यात भर म्हणजे, युवा विकास उपक्रमांवर नवीन लक्ष केंद्रित केले आहे. त्यातूनही क्रिकेटची प्रगती अपेक्षित आहे. युनायटेड स्टेट्स युथ क्रिकेट असोसिएशन (यूएसवायसीए) सारखे उपक्रम क्रिकेटच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण आहेत.

शालेय स्तरावर क्रिकेटची ओळख करून देण्यामागची कल्पना म्हणजे क्रिकेट हे स्थलांतरित समुदायांच्या पलीकडे जावे यासाठी उत्तम आहे. त्यातून अमेरिकन तरुणांमध्ये क्रिकेटबद्दल खरी आवड निर्माण होईल. अलिकडच्या काळात, क्रिकेटने संपूर्ण अमेरिकेमध्ये, विशेषतः ह्यूस्टन, न्यूयॉर्क आणि लॉस एंजेलिससारख्या दक्षिण आशियाई समुदायांची दाट लोकवस्ती असलेल्या भागात, लोकप्रियतेत चांगलीच वाढ अनुभवली आहे. उदाहरणार्थ, एकट्या डॅलस-फोर्ट वर्थ क्षेत्रामध्ये 220,000 पेक्षा जास्त भारतीय-अमेरिकन लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे. T20 फॉरमॅटचा उदय झाल्यानंतर युनायटेड स्टेट्स ऑफ क्रिकेटनुसार, या खेळात सध्या देशभरातील 200,000 पेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग आहे.

संपूर्ण युनायटेड स्टेट्समध्ये 400 हून अधिक स्थानिक लीग, स्पर्धा, अकादमी, महाविद्यालय आणि शालेय कार्यक्रमांमध्ये हे उत्साही खेळाडू सहभागी होतात. यूएस मध्ये क्रिकेट हार्डबॉल, टेपबॉल, सॉफ्टबॉल, अपंग क्रिकेट आणि इनडोअर क्रिकेट यासह विविध फॉरमॅटमध्ये खेळला जातो. मात्र, त्यांना T20 फॉरमॅटमध्ये खूपच भावला आहे. नवीन टी २० फॉर्मॅट क्रिकेट हा प्रामुख्यानं बेसबॉलशी स्पर्धा करू शकतो हे लक्षात यायला लागलं आहे. कमीतकमी वेळेत तुफानी खेळाचा अनुभव यातून येताना दिसतो. यामुळेच T20 फॉरमॅट अमेरिकेत वेगानं पाय रोवू लागला आहे. लोकप्रिय अमेरिकन खेळांप्रमाणेच एक रोमांचकारी अनुभव T20 क्रिकेटमधूनही मिळतोय याचा प्रत्यय आता अमेरिकन तरुणानांना येत आहे.

यामुळेच गुंतवणूकदारांचे हित जपणारा खेळ म्हणून क्रिकेट अमेरिकेत वाढत आहे. त्यामुळे 'सॅम अंकल' च्या देशात क्रिकेटला मोठं व्यावसायिक यश आणि नफा मिळण्याची शक्यता वाढली आहे. हेच कारण आहे की, अफाट यूएस मार्केटमध्ये नवीन स्पोर्टिंग स्पिरीट क्रिकेटनं निर्माण केलंय. यातूनच गुंतवणूकदारांना मोहित केलं आहे. त्यांच्या आर्थिक पाठबळामुळे पायाभूत सुविधांचा विकास, लीग प्रमोशन आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टार्सच्या संभाव्य येण्याला चालना मिळते. गुंतवणुकदारांनी यूएसमधील क्रिकेटच्या वाढीच्या क्षमतेवर प्रचंड विश्वास दाखवला आहे. क्रिकेटच्या विस्ताराच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी 1 अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त खर्च केला जात आहे.

या गुंतवणुकीचा एक मोठा भाग, म्हणजेच 100 दशलक्ष पेक्षा जास्त डॉलर, आगामी लीगसाठी क्रिकेट स्टेडियम बांधण्यासाठी वापरण्यात येणार आहे. जूनमध्ये जसजसा ICC T20 विश्वचषक जवळ येत आहे, तसतसे सर्वांचे लक्ष मुख्य प्रवाहातील अमेरिकन प्रेक्षकांमध्ये क्रिकेटच्या स्वागताकडे असेल. MLC (मेजर लीग क्रिकेट) आणि आगामी विश्वचषक स्पर्धेचे यश हे यूएसमधील खेळाच्या भविष्यासाठी लिटमस चाचणी म्हणून काम करेल. मुख्य प्रवाहात क्रिकेटला स्वीकारण्याच्या दिशेने त्याच्या प्रवासात एक निर्णायक क्षण असेल.

हेही वाचा..

  1. 'हे' आहेत T20 विश्वचषकासाठी संभाव्य खेळाडू - T20 World Cup
  2. गृहयुद्धाच्या काळात अमेरिकेतून विलुप्त झाले होते क्रिकेट, T20 विश्वचषक वरदान ठरेल का? - T20 WORLD CUP 2024

ABOUT THE AUTHOR

...view details