हैदराबाद Highway Terror - भारतीय रस्ते अपघातांमुळे दर तीन मिनिटांनी एक मृत्यू होत आहे. सीट बेल्टचा (seat belt) वापर अशा दुर्दैवी घटनांमध्ये प्रवाशांचा जीव वाचवण्यात लक्षणीय भूमिका बजावतो. देशातील एकूण रस्ते पाहता द्रुतगती मार्ग आणि राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग फक्त 5% आहेत. मात्र अपघातांची संख्या प्रचंड आहे. केंद्रीय वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने खुलासा केला आहे की, या रस्त्यांवर 2022 मध्ये 51,888 लोकांचा मृत्यू झाला होता. ज्याचे कारण भयंकर वेग हे आहे. विशेष म्हणजे, सीट बेल्ट न लावल्यामुळे 8,384 ड्रायव्हर आणि 8,331 प्रवाशांचा मृत्यू झाला. संशोधनात असं सूचित केलय की, सीट बेल्टचा वापर केल्याने अपघातांमधील एक तृतीयांश लोकांच्या वाचण्याची शक्यता खूप असते. ज्यामुळे रस्त्यावरील रहदारीतील मृत्यू कमी करण्यासाठी सीटबेल्ट या सुरक्षा उपायाचे (safety norms) महत्त्व अधोरेखित होते.
आजच्या युगात जिथे रस्ता सुरक्षा सर्वोपरी आहे, अमेरिका, चीन, रशिया, नॉर्वे, डेन्मार्क आणि जपानसारख्या देशांनी गेल्या दशकात रहदारी अपघात आणि मृत्यूचे प्रमाण निम्मे करून एक आदर्श दिला आहे. शिवाय, तीस पेक्षा जास्त राष्ट्रांनी 30% ते 50% पर्यंत अपघातांची संख्या कमी करुन दाखवली आहे. या यशाचं श्रेय सीट बेल्ट तंत्रज्ञानातील प्रगती आणि वाहन सुरक्षा वैशिष्ट्यांसह रस्ता सुरक्षा नियमांच्या कडक अंमलबजावणीला दिलं जातं. यूएस नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी ॲडमिनिस्ट्रेशनने अहवाल दिला आहे की, 2017 मध्ये, सीट बेल्ट कायद्याच्या कठोर अंमलबजावणीमुळे जवळपास 15,000 लोकांचे जीव वाचले. ज्याचे पालन दर 90% पेक्षा जास्त होते. याउलट, भारताला भयंकर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. जिथे दरवर्षी 9,000 पेक्षा जास्त लोक बसेसच्या अपघातात, वाहनांची गर्दी असते आणि खड्डेमय रस्त्यांवर होतात. चिंताजनक बाब म्हणजे, या अपघातांमुळे दरवर्षी जवळपास हजार मुलांचा आणि प्रौढांचा बळी जातो. त्या तुलनेत, आंतरराष्ट्रीय रोड फेडरेशनच्या मते, अमेरिकेमध्ये 2021 मध्ये केवळ 14 मृत्यू झाले आणि चीनमध्ये 2022 मध्ये अशाच घटनांमुळे 215 मृत्यू झाले. ही एक शोकांतिका आहे की, जगातील केवळ 1% वाहने भारतात असूनही, जागतिक रस्ते अपघातांपैकी 11% अपघात भारतात होतात.