Marriage of souls : एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर संबंधित व्यक्ती भावनिक दुःखातून जातात. त्यामुळं प्रत्येक व्यक्तींची शोक व्यक्त करण्याची पद्धत व्यक्तीनुसार तसंच संस्कृतीनुसार बदलते. एखाद्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूला सामोरं जाण्यासाठी शोक हा सामान्य मार्ग आहे. लोक दु:खाला तोंड देण्याचे अनेक वेगवेगळे मार्ग शोधतात. ज्यात धार्मिक विधी, धार्मिक प्रथांद्वारे त्यांच्या भावना व्यक्त करतात. त्यात देखील प्रत्येकाची भावना व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असल्याचं दिसून येतं.
काही हिमालयीन प्रदेशात तरुणाच्या मृत्यूबद्दल नागरिक आपलं दुःख व्यक्त करताना 'मृत व्यक्ती'ला 'वर' म्हणून संबोधून रडतात. त्याचप्रमाणे ते मृत महिलेला तिच्या निधनानंतर वधू म्हणून संबोधतात. कारण त्यांच्या मुलाचं लग्न न झाल्याच्या दु:खातून त्यांची कधीही न संपणारी वेदना त्यांना आयुष्यभर सतावत असते.
- "आफ्टरलाइफ वेडलॉक बिलीफ सिस्टम"
कर्नाटक, केरळच्या किनारी प्रदेशातील काही समुदायांतील नागरिकांमध्ये ‘लग्नाच्या गाठी स्वर्गात बाधल्या जातात’ अशा कल्पना करतात. त्यामुळं सात जन्मापर्यंत आपण वेगळं होऊ शकत नाही, असा समज या समुदायांचा दिसून येतो. या राज्यांतील किनारी प्रदेशात राहणाऱ्या गावमधील लोकांचा असा विश्वास आहे की, लग्नाचं फळ चाखल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीचा मृती होऊ नये, म्हणून त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या मुलांचं लग्न करण्याची त्यांची इच्छा आहे. या प्रदेशांमध्ये, विवाह संस्था शक्तिशाली असल्यामुळं मृत व्यक्ती देखील वैवाहिक व्यवस्थेचा भाग असल्याचं दिसून येते.
- "भूत विवाह"
मृतांशी लग्न करणे ही एक परंपरा बनली आहे. ज्या कुटुंबांनी लहान वयात प्रिय व्यक्ती गमावली आहे त्यांना प्रत्येक विधी पाळावा लागतो. कारण मृत व्यक्ती जिवंत असल्यास सर्व विधी पाळणं आवश्यक असतं. त्यामुळं जिवंत नसलेल्या व्यक्तीचं लग्न लावण्याची पद्धत रुढ आहे. ‘प्रेथा मदुवे’ (आत्म्यांचे लग्न) असं या पद्धतीचं नाव आहे. जरी ही पद्धत विचित्र वाटत असली तरी, लग्नाचा हेतू दु:ख कमी करण्याचा पयत्न आहे. काही समाजात लग्नासाठी अनेक वर्षांची तळमळ अविवाहित आत्म्यांना त्रास देते. त्यामुळं मृत व्यक्ती त्यांच्या कुटुंबीयांना नंतरच्या स्वप्नात वारंवार याची आठवण करून देतात.
- "मॅच मेकिंग"
त्यांच्या प्रिय मुलासाठी किंवा मुलीसाठी योग्य जोडीदार शोधण्यासाठी, मॅचमेकिंग सुलभ एक जाहिरात प्रकाशित केली जाते. यावेळी यादी करून योग्य जोडीदार निवडण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो.