महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / opinion

सैन्य कमांड महिलांच्या हाती देताना त्यातील सकारात्मक आणि नकारात्मक बाबी

लष्करातील महत्त्वाची कमांडरची पदं महिलांना देण्याच्या दृष्टीनं तयारी सुरू झालीय. यापूर्वी लष्करातील काही आस्थापनांच्या प्रमुख महिला राहिल्या आहेत. यासंदर्भातील निवृत्त अधिकारी हर्ष कक्कर यांचा लेख.

आर्मी मेडीकलच्या युनिटचे जवान दिल्लीतील परेडमध्ये
आर्मी मेडीकलच्या युनिटचे जवान दिल्लीतील परेडमध्ये (ANI)

By Major General Harsha Kakar

Published : Dec 3, 2024, 3:50 PM IST

एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने आपल्या वरिष्ठांना लिहिलेल्या सोशल मीडियावर उपलब्ध असलेल्या एका पत्राने सुरक्षा दलातील महिला अधिकाऱ्यांच्या क्षमतेवर बोट दाखवल्याने या विषयावर पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे. सध्याच्या कमांडमधील महिला अधिकारी भारतीय सैन्यात पहिल्या फळीच्या आहेत. भारतीय सैन्यात कर्नल पदासाठी एक हजाराहून अधिक कमांड पोझिशन्स आहेत. ज्यापैकी एक भाग सध्या महिला अधिकाऱ्यांकडे आहे, मुख्यत्वे लढाऊ क्षेत्राच्या बाहेर आणि स्थिर किंवा सपोर्ट युनिट्समध्ये महिला आहेत. पत्रात म्हटल्याप्रमाणे केवळ महिला अधिकाऱ्यांमध्येच कमकुवतपणा दिसून येतो असं दिसतं.

बहुतेक लोक ज्यांनी सैन्यात सेवा केली आहे त्यांनी कमांडमध्ये (आमच्याकडे कधीच स्त्रिया नव्हत्या) विविध गुणधर्म पाहिले आहेत. काही कमांडिंग अधिकारी इमाने इतबारे सेवा करत होते. तर काही बोधवाक्याला जागत होते. जे पूर्वसुरींच्या पावलावर पाऊल ठेवून राष्ट्रसेवा करत होते. काही असंवेदनशील आणि अधीर होते. काहींनी फक्त त्यांच्या वैयक्तिक कारकिर्दीकडे पाहिले तर काहींनी स्वतःच्या उन्नतीसाठी काम केले, क्वचितच कोणी अयशस्वी झाले.

काहीजण असे आहेत ज्यांनी ते काम करत असलेल्या कमांडला न्याय दिला नाही. त्यांची प्रतिष्ठा राहिली नाही. तर काहींनी खराब कामगिरी करणाऱ्या प्रतिष्ठानांना आपल्या कर्तृत्वानं वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. काहींना घरच्या आघाडीच्या दबावाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांच्या कामगिरीवर परिणाम होतो, तर काही असे आहेत, ज्यांची कुटुंबे मदत करतात आणि त्यांना त्यांच्या हातात असलेल्या कामावर लक्ष केंद्रित करण्यास सक्षम करतात. थोडक्यात, कमांडमध्ये अनेक व्यक्ती आहेत, ज्यांनी यश मिळवले आणि पुढे गेले, काही ज्यांनी चांगली कामगिरी केली आणि त्यांचा कोणताही दोष नसतानाही परिणाम भोगावे लागले, तसंच काहींनी कुचकामी कामगिरी करून ठेवली. कमांडमधील महिलांसाठी असा मिश्र अनुभव आहे.

कोणत्याही देशाच्या सशस्त्र दलातील सेवानिवृत्त किंवा सेवेत असलेल्या सैनिकाला किंवा कर्मचाऱ्याला विचारा तो त्यांच्या कमांडिंग अधिकाऱ्यांचे वेगवेगळे वर्णन करेल. काहीजण असे असतात, ज्यांच्याबरोबर नेहमीच काम करावं वाटतं. तर काही असे असतात, जे कधीच भेटू नये असं वाटतं. लढाईत माणूस ध्वजासाठीच नाही तर बटालियनच्या इज्जतसाठी आणि कमांड देणाऱ्यांवरच्या विश्वासासाठी मरतो. त्याला माहीत असतं की त्याच्या जवळच्या नातेवाईकांची काळजी घेतली जाईल. मात्र सगळेच कमांडिंग ऑफिसर असे असतात असं नाही.

कमांडसाठी निवड होण्याकरता विविध निवड चाचण्यातून जावे लागते. यासाठीची चाचणी मंडळे वाजवी सेवेच्या कालावधीद्वारे वरिष्ठ अधिका-यांनी केलेल्या मूल्यांकनावर आधारित काम करतात. संबंधितांचं काम कसं होतं. अधिकाऱ्यांच्याबरोबरची वागणूक कशी होती. त्यातून नेतृत्वगुण पारखले जातात. त्यानंतर निवड केली जाते. काहीवेळा अशा प्रकारे केलेली निवड योग्य होते. तसंच काहीवेळी या निवडीमध्ये फसगत होण्याची शक्यताही असते. मात्र अशी फसगत झाली म्हणजे सगळी निवड प्रक्रियाच दोषपूर्ण आहे, असं म्हणता येणार नाही.

एखादा अधिकारी त्याच्या सुरुवातीच्या वर्षांच्या सेवेत शिकतो. त्याच्या योग्य ग्रूमिंगची जबाबदारी वरिष्ठांची असते आणि मुख्यतः कमांडिंग ऑफिसरची असते. सामान्यतः, बहुतेक तरुणांमध्ये तेच आदर्श असतात, मुख्यतः त्यांनी ज्यांच्या हाताखाली त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात सेवा केलेली असते. ते जे शिकतात आणि आत्मसात करतात तेच ते अनुसरण करतात. सेवेच्या नंतरच्या टप्प्यातील त्रुटी मुख्यतः चुकीच्या ग्रूमिंगमुळे होत आहेत. प्रेरणा, सेवेचा आदर, कमांड अंतर्गत असलेले पुरुष आणि यशस्वी होण्याची इच्छा यासह कमांडवर परिणाम करणारे इतर घटक आहेत. म्हणून, ग्रूमिंग व्यतिरिक्त वैयक्तिक गुणधर्म आहेत, जे एका रात्रीत विकसित होत नाहीत, परंतु संपूर्ण सेवेमध्ये ते दिसतात.

विविध स्तरांवरील अभ्यासक्रम सैद्धांतिक ज्ञान प्रदान करू शकतात, परंतु एखाद्या व्यक्तीने व्यावहारिक अनुभवाद्वारे या क्षेत्रात जे काही शिकले आहे त्याला पर्याय नाही. या कारणास्तव एखादी व्यक्ती त्याच्या सेवेत कमांडच्या वेगवेगळ्या टप्प्यांतून जाते आणि प्रत्येक स्तरावर त्याचे बारकाईने निरीक्षण केले जाते. सर्व सशस्त्र दलांच्या आस्थापनांवर वरिष्ठांकडून बारकाईने लक्ष ठेवले जाते. हे मॉनिटरिंग अनेक माध्यमांद्वारे केले जाते. मानव-व्यवस्थापनातील त्रुटी आणि कमांडमधील त्रुटी देखील विविध यंत्रणेद्वारे दुरुस्त केल्या जाऊ शकतात, ज्यात वरिष्ठांचे समुपदेशन आणि सल्ला समाविष्ट आहे.

महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विविध स्तरांवर फील्ड रुग्णवाहिका युनिट्स आणि रुग्णालयांना वर्षानुवर्षे तत्परतेने कमांड केले आहे. या सोप्या आस्थापना नाहीत, विशेषत: रुग्णालये, जिथे कामाचा ताण जास्त आहे, कर्मचारी आणि उपकरणे यांची कमतरता ही एक सामान्य वस्तुस्थिती आहे आणि तेथे विविध प्रकारचे रुग्ण आहेत. या आस्थापनांचे कमांडिंग अधिकारी नेहमीच चर्चेत असतात. काहींना टीकेचा सामना करावा लागतो.

काही कमतरतांमुळे सर्व महिला कमांडिंग ऑफिसर्सना एकाच तराजूत तोलून चालणार नाही. त्यांच्यामध्ये जसे चांगले अधिकारी असतील तसेच त्यांच्या पुरुष समकक्षांमध्येही असेल. सर्वात आवश्यक आहे ते मार्गदर्शन करण्यासाठी, सल्ला देण्यासाठी आणि कमांडमधील त्रुटी सुधारल्या जातील आणि युनिट आणि त्याच्या सदस्यांचे पावित्र्य संरक्षित केले जाईल याची खात्री करण्यासाठी वरिष्ठांनी लक्ष घातलं पाहिजे. तरच महिला कमांड अधिक चांगल्या पद्धतीनं पुढे येईल.

ABOUT THE AUTHOR

...view details