महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 13, 2024, 10:27 AM IST

ETV Bharat / international

Rocket Explodes In Japan : टेक ऑफ केल्यानंतर खासगी रॉकेटचा झाला स्फोट; जापान हादरलं

Rocket Explodes In Japan : स्पेस वन या कंपनीनं तयार केलेल्या पहिल्या खासगी रॉकेटचा टेकऑफनंतर लगेच स्फोट झाला. ही घटना मध्य जापानमध्ये बुधवारी घडली.

Rocket Explodes In Japan
Rocket Explodes In Japan

टोकियो Rocket Explodes In Japan :खासगी क्षेत्रातील पहिलं रॉकेट टेक ऑफ केल्यानंतर काही क्षणातच कोसळलं. ही घटना मध्य जापानमधील वाकायामा प्रीफेक्चर प्रांतात बुधवारी घडली. घनदाट अरण्यांनं वेढलेल्या जापानच्या वाकायामा परिसरात क्षणातचं हा भयंकर स्फोट झाल्यानं नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. हवेतच हे स्फोट झाल्यानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या खासगी रॉकेटचं टेकऑफ होत असताना लाईव्ह स्ट्रीम सुरु असल्यानं रॉकेटचा झालेल्या स्फोटाचं चित्रिकरण झालं आहे.

आगीच्या ज्वालांनी हादरला परिसर :जापानच्या पहिल्या कैरोस या खासगी रॉकेटचा भीषण स्फोट झाला. या रॉकेटच्या स्फोटानं मध्य जापानमधील वाकायामा प्रीफेक्चर प्रांतात चांगलाच हादरा बसला. यावेळी हवेतच मोठ्या आगीच्या ज्वालांनी हा परिसरात चांगलाच हादरुन गेला. आग लागल्यानंतर आगीवर नियंत्रण आणण्यासाठी पाण्याचा मारा करण्यात आला. स्टार्ट अप स्पेस वन या संस्थेचं हे खासगी रॉकेट असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र स्फोट झाल्यानंतर स्पेस वन या संघटनेनं कोणताही प्रतिसाद दिला नाही.

स्पेस वन ठरली असती पहिली कंपनी :स्पेस वन या खासगी कंपनीच्या वतीनं हे पहिलं खासगी रॉकेटचं प्रक्षेपण करण्यात आलं होतं. मात्र रॉकेटचं प्रक्षेपण केल्यानंतर त्याचा लगेच स्फोट झाला. या रॉकेटचं प्रक्षेपण या अगोदरही पुढं ढकलण्यात आलं होतं. शनिवारी कैरोस रॉकेटचं प्रक्षेपण करण्याच्या अगोदर त्या परिसरात एक जहाज दिसून आलं. त्यामुळं या रॉकेटचं प्रक्षेपण पुढं ढकलण्यात आलं. त्यानंतर बुधवारी सकाळी कैरोस रॉकेटचं प्रक्षेपण करण्यात आलं. मात्र त्याचा स्फोट झाल्यानं ही मोहीम अयशस्वी झाली. ही मोहीम यशस्वी झाली असती, तर स्पेस वन कंपनी ही अंतराळात रॉकेट पाठवणारी पहिली खासगी कंपनी ठरली असती.

स्पेस वन कंपनीची स्थापना झाली होती 2018 मध्ये :टोकियो इथली स्पेस वन ही कंपनी खासगी रॉकेट बनवणारी कंपनी आहे. स्पेस वन या कंपनीची स्थापना 2018 मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर या कंपनीनं खासगी रॉकेट तयार करण्यास सुरुवात केली. मात्र स्पेस वन या कंपनीनं बनवलेल्या पहिल्याचं रॉकेटचा स्फोट झाला.

हेही वाचा :

  1. फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; 7 जणांचा मृत्यू, 42 हून अधिक गंभीर जखमी
  2. मोबाईल की बॉम्ब? खेळत असताना मोबाईल बॅटरीचा स्फोट होऊन चिमुकल्याचा मृत्यू
  3. सीरियात रॉकेट हल्ल्यात 5 ठार

ABOUT THE AUTHOR

...view details