महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

अयातुल्ला खमेनी यांचं फेसबुक-इन्स्टाग्राम खातं बंद, इराणनं मेटाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची करुन दिली आठवण - Meta closed Ayatollah Khamenei FB

Iran condemns Meta : इराणनं अयातुल्ला खमेनी यांचं फेसबुक तसंच इन्स्टाग्राम खातं बंद केल्याप्रकणी मेटा कंपनीचा निषेध केला आहे. अयातुल्ला खमेनी यांचं सोशल मिडियावरील खातं बंद करण म्हणजे 'अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं उल्लंघन' असल्याचं म्हटलं आहे.

Iran condemns Meta
Iran condemns Meta

By ANI

Published : Mar 10, 2024, 10:01 AM IST

Updated : Mar 10, 2024, 10:29 AM IST

तेहरान(इराण) Iran condemns Meta : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी याचं फेसबुक तसंच इन्स्टाग्राम खात्यांवर बंदी घातल्याप्रकरणी इराणनं नाराजी व्यक्त केली आहे. फेसबुकनं घेतलेला निर्णय "अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं उल्लंघन" करणारा असल्याचं इराणनं म्हटलं आहे. त्यांची त्यांनी फेसबुक कंपनीच्या निर्णयाचा निर्णयचा निषेध केलाय.

'इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी कंपनीच्या धोरणाचं उल्लंघन केल्याबद्दल फेसबुक तसंच इन्स्टाग्रामवरील त्यांच्या खात्यांवर बंदी घातली आहे. "कंपनीच्या धोरणाचं वारंवार उल्लंघन केल्यामुळं आम्ही त्यांच्या खात्यावर बंदी घातली आहे,"- मेटा

"इन्स्टाग्राम तसंच फेसबुक इराणी लोकांसाठी सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत, परंतु सरकारनं त्यांचा वापर अवरोधित केला असताना, इस्लामिक रिपब्लिकमधील अधिकाऱ्यांची खाती त्यांच्यावर आहेत. मेटा कंपनीनं गेल्या महिन्यात सांगितलं की, त्यांनी "धोकादायक संस्था, व्यक्तींबाबतच्या धोरणाचे वारंवार उल्लंघन केल्याबद्दल फेसबुक तसंच इन्स्टाग्रामवरून खमेनी यांची खाती काढून टाकली आहेत.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिखाऊपणाच्या घोषणा :"प्रत्युत्तरात, इराणचे परराष्ट्र मंत्री होसेन अमीर-अब्दोल्लाहियान यांनी म्हटलं की, मेटा कंपनीनं उचलेलं पाऊत "केवळ भाषण स्वातंत्र्याचं उल्लंघनच नाही तर त्याच्या स्थानांचा तसंच इराणमधी लाखो अनुयायांचा अपमान आहे."अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे ब्रीदवाक्य केवळ पोकळ तसंच दिखाऊपणाच्या घोषणा आहेत.

इस्रायलवर हल्ला केलं होतं समर्थन : इराणमध्ये 35 वर्षांपासून सत्तेत असलेल्या खामेनी यांचे इन्स्टाग्राममवर 5 मिलियन फॉलोअर्स आहेत. ऑक्टोबरला हमासनं इस्रायलवर हल्ला केल्यानंतर खामेनी यांच्यावर निर्बंध लादण्याचा दबाव होता. हल्ल्यानंतर, खामेनी यांनी हमासच्या रक्तरंजित हल्ल्याचं समर्थन केलं होतं, परंतु त्यात इराणचा सहभाग नाकारला होता. तसंच त्यांनी इस्रायलच्या गाझावरील बॉम्बहल्ला तसंच येमेनच्या हुथी बंडखोरांनी लाल समुद्रात जहाजावरील हल्ल्याचं जाहीरपणे समर्थन केलं होतं.

  • इराणमध्ये इंटरनेटवर कठोर नियम :इंटरनेट सेन्सॉरशिपच्या बाबतीत इराणमध्ये कठोर नियम आहेत. इराण सरकारनं इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया तसेच ब्लॉगर, एचबीओ, यूट्यूब, नेटफ्लिक्स सारख्या अनेक लोकप्रिय वेबसाइट्स ब्लॉक केल्या आहेत.

हे वाचलंत का :

  1. अज्ञात हल्लेखोरांकडून इराणमध्ये 9 पाकिस्तानी नागरिकांची हत्या; दोन देशांमध्ये पुन्हा वाढणार तणाव
  2. वाद पेटला! इराण समर्थित दहशतवाद्यांचा हवाई तळावर हल्ला, अमेरिकन सैनिक जखमी
  3. दोन मुस्लीम देशांमध्ये युद्ध होणार? इराण अन् पाकिस्तानमधील संबंध या टोकापर्यंत कसे पोहचले?
Last Updated : Mar 10, 2024, 10:29 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details