मेलबर्न AUS vs IND 4th Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ यांच्यातील मेलबर्न कसोटी सामन्यात 4 दिवसांचा खेळ पूर्ण झाला असून सामना एका रोमांचक वळणावर आला आहे. सामन्याचा चौथा क्वार्टर भारतीय गोलंदाजांच्या नावावर होता, ज्यांनी दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना जास्त वेळ मैदानावर टिकू दिलं नाही. पण दिवसाच्या शेवटच्या 18 षटकांमध्ये असं काही घडलं ज्याची भारतीय चाहत्यांना अजिबात अपेक्षा नव्हती. परणामी पुन्हा एकदा हा सामना भारतीय संघापासून दूर गेला आहे. यामागचं कारण आहे नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.
AUSTRALIA FROM 91/6 TO 200/9. pic.twitter.com/skaixVHNTV
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 29, 2024
मेलबर्नमध्ये भारताचं काय झालं? : मेलबर्न कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाचा पहिला डाव 369 धावांवर संपला आणि ऑस्ट्रेलियानं 105 धावांची आघाडी घेतली. पण ऑस्ट्रेलियाची अव्वल फळी दुसऱ्या डावात फार काही करु शकली नाही. त्यांनी सातत्यानं विकेट गमावल्या, त्यामुळं ऑस्ट्रेलियाचे 9 फलंदाज 173 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले. अशा स्थितीत नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड यांनी मैदानावरील शेवटच्या जोडीची जबाबदारी सांभाळली, मात्र चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ही जोडी फोडण्यात भारतीय गोलंदाजांना अपयश आलं.
AUSTRALIA ENDS DAY 4 AFTER BEING 91/6 TO 228/9. 🤯
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 29, 2024
- Day 5.
- 96 overs.
- Australia with a lead of 333 runs.
- India need 1 wicket & need to chase the target.
WE'RE IN FOR A BLOCKBUSTER MONDAY - GOOD LUCK, TEAM INDIA. 🇮🇳 pic.twitter.com/ch9I6vzTVx
दहाव्या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी : नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड यांच्यात 110 चेंडूत 10व्या विकेटसाठी आतापर्यंत 55 धावांची भागीदारी झाली आहे. हे दोन्ही खेळाडू खेळाच्या पाचव्या दिवशीही फलंदाजी करतील. त्यामुळं भारताचं लक्ष्य मोठं होत आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मानं ही जोडी फोडण्याचे अनेक प्रयत्न केले, मात्र एकाही गोलंदाजाला हे जमलं नाही. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजही अपयशी ठरले, त्यामुळं भारताचं टेन्शन वाढलं आहे.
A solid rearguard display from Nathan Lyon and Scott Boland adds to Australia’s lead in the Boxing Day Test 💪#AUSvIND 📝:https://t.co/2F5RfaySGH#WTC25 pic.twitter.com/LEDoP2kZgd
— ICC (@ICC) December 29, 2024
3 DRS, 6 गोलंदाज तरीही विकेट नाही : नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँडची जोडी फोडण्यासाठी भारतानं एकूण 6 गोलंदाजांचा वापर केला. ज्यात जसप्रीत बुमराह, आकाश दीप, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र त्यापैकी एकालाही विकेट घेता आली नाही. एवढंच नाही तर रोहित शर्मानं या जोडीविरुद्ध आपले तीनही डीआरएस वापरले. पण प्रत्येक वेळी हे फलंदाज टिकून राहण्यात यशस्वी ठरले. आता खेळाच्या शेवटच्या दिवशी लवकरात लवकर ही जोडी फोडण्यावर भारतीय संघाची नजर असेल, जेणेकरुन लक्ष्य वाढण्यापासून रोखता येईल.
That's Stumps on Day 4
— BCCI (@BCCI) December 29, 2024
Australia reach 228/9 and lead by 333 runs
Updates ▶️ https://t.co/njfhCncRdL#TeamIndia | #AUSvIND pic.twitter.com/Gw8NbCljL7
सामना जिंकण्यासाठी मोठं आव्हान : नॅथन लियॉन सध्या 54 चेंडूत 41 धावा करुन नाबाद आहे आणि स्कॉट बोलंडनं 65 चेंडूत 10 धावा केल्या आहेत. त्यामुळं दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 9 गडी गमावून 228 धावा झाली असून त्यांची आघाडी 333 धावांवर पोहोचली आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडच्या इतिहासात एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग कधीच झाला नव्हता, जे भारतीय संघासाठी मोठं आव्हान असणार आहे.
हेही वाचा :