मुंबई : पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ रविवारी त्याच्या शोसाठी आसाममधील गुवाहाटीला पोहोचला. त्याला पाहण्यासाठी याठिकाणी चाहत्यांनी मोठी गर्दी जमली होती. दिलजीतनं इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. दरम्यान भारतातील दिलजीतचे कॉन्सर्ट खूप लोकप्रिय झाले आहेत, यामुळे तो श्रीमंत कलाकारांच्या यादीत सामील झाला आहे. 29 डिसेंबर रोजी म्हणजेच आज दिलजीत आपल्या गाण्यानं चाहत्यांना घायाळ करण्यासाठी सज्ज आहे. दरम्यान दिलजीत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याच्याबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. अलीकडे 'पंजाबच्या स्पेलिंगमध्ये 'यू' ऐवजी 'ए' लिहिल्याबद्दल दिलजीतवर गदारोळ झाला होता. यावर दिलजीतनेही अनोख्या पद्धतीनं उत्तर दिलं होतं. त्यानं सोशल मीडियावर एक लांबलचक संदेश लिहिला होता, यामध्ये त्यानं इंग्रजी भाषा किती गुंतागुंतीची असू शकते, हे स्पष्ट केलं होतं. या पोस्टमध्ये त्यानं त्याची पहिली भाषा इंग्रजी नाही, याबद्दल देखील सांगितलं होतं.
दिलजीत दोसांझचा कॉन्सर्ट : तसेच त्यानं त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, त्याचे भारतावर प्रेम आहे, हे किती वेळा सिद्ध करावं लागेल ? असा सवाल देखील त्यानं केला होता, काहीतरी नवीन आणा, असं बोलून त्यानं ट्रोलर्सला शांत केलं होत. याशिवाय हिंदी आणि पंजाबी चित्रपटसृष्टीत दिलजीतनं आपल्या यशाचा ठसा उमटवला आहे. त्याला अनेक बॉलिवूड चित्रपटांचे देखील ऑफर्स येत आहेत. याशिवाय त्यानं वेगवेगळ्या देशांमध्ये देखील आपले कॉन्सर्ट केले आहे. आता दिलजीतनं आपल्या गायकीनं जगभरात लोकप्रियता मिळवली आहे.
दिलजीत दोसांझचं वर्कफ्रंट : दिलजीत 31 डिसेंबर रोजी लुधियानामध्ये त्याच्या दिल-लुमिनाटी टूरचा समारोप करणार आहे. दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टच्या तिकिट्स मिळत नसल्यानं अनेकांनी यापूर्वी आपली नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान दिलजीतनं बॉलिवूडमध्ये 2016 मध्ये क्राइम थ्रिलर 'उडता पंजाब'द्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होत. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या सर्वोत्कृष्ट मेल पदार्पणासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळवला आहे. दिलजीतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, पुढं तो सनी देओलबरोबर 'बॉर्डर 2' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. याशिवाय तो 'नो एंट्री 2'मध्ये देखील असणार आहे.
हेही वाचा :