Benefits Of Boiled Eggs :अंड्यांना आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. त्याचात परिणाम आहे की, बरेच लोक शरीराला आवश्यक पोषक घटक, प्रथिनं आणि जीवनसत्त्व मिळण्यासाठी दररोज एक ते दोन उकडलेली अंडी खातात. जिम आणि वर्कआउट करणारी लोक तर दिवसाला ३ ते ४ अंडी खातात. हिवाळ्यामध्ये बहुतांश लोकांच्या जेवणात अंड्यांच्या समावेश असतो. आपणही त्यापैकी आहात का? जर तुम्ही सुद्धा नियमित अंडी खात असाल तर याचे फायदे आणि तोटे माहिती आहेत का? आज आपण हेच जाणून घेण्याचा प्रयत्न करू.
सुप्रसिद्ध पोषणतज्ञ डॉ. शुभांगी तम्मलवार यांच्या मते, दररोज किमान एक अंडा खाणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अंड्यांमध्ये शरीराला आवश्यक अमीनो अॅसिड प्रचुर मात्रेत आढळते. यामुळे स्नायू बळकट होतात.
- अंडी खाण्याचे आरोग्यदायी फायदे
- पोषक तत्वांनी समृद्ध : अंड्यांमध्ये जीवनसत्त्वे ए, डी, ई, बी12, फोलेट, लोह, फॉस्फरस, सेलेनियम आणि शरीराला आवश्यक असलेले इतर पोषक घटक असतात. उकडलेल्या अंड्याच्या सेवनातून मिळणारी ही पोषकतत्त्वं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असल्याचं डॉ. शुभांगी पोषणतज्ञ त्यांनी सांगितलं.
- मजबूत स्नायू: अंडी हे प्रथिनेयुक्त पदार्थांपैकी एक आहे. नियमित अंडी खाल्ल्यास शरीराला आवश्यक प्रथिनं आणि स्थायूंना बळकट करण्यासाठी यातील अमिनो ॲसिड मदत करतात. तसंच खराब ऊतींच्या दुरुस्तीसाठी मदत करतात.
- हृदयाचं आरोग्य सुधारतं: अंड्यांमध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण असूनही, कमी प्रमाणात सेवन केल्यास हृदयाच्या आरोग्यासाठी अंडी फार महत्त्वाची आहेत, असं पोषणतज्ज्ञ सांगतात. अंडी ओमेगा -3 फॅटी अॅसिड आणि अँटिऑक्सिडंट्स सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध असतात. यामुळं पोटातील जळजळ कमी करण्यासाठी अंडी उपयुक्त आहेत. तसंच हृदयाशी संबंधित समस्या कमी करण्यासाठी देखील महत्त्वाची भूमिका बजावतात.
- मेंदूचं कार्य सुधारतं:अंड्यांमध्ये कोलीन भरपूर असतं.(नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन रिपोर्ट) हे मेंदूच्या आरोग्यासाठी आणि संज्ञानात्मक कार्यासाठी आवश्यक पोषक आहे. त्यामुळे रोज एक किंवा दोन उकडलेली अंडी खाल्ल्यानं स्मरणशक्ती, एकाग्रता आणि एकूण मेंदूचं कार्य सुधारतं, असं डॉ. शुभांगी सांगतात.
- वजन नियंत्रण:अंड्यांमध्ये कॅलरीज कमी असतात. त्यामुळं ज्यांना वजन कमी करायचं आहे, त्यांनी रोज उकडलेली अंडी खावी. अंडी खाल्ल्यास पोट भरलं असतं परिणामी आपण जेवताना कमी कॅलरी घेतो. यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
- आणखी काही आरोग्य फायदे
अंड्यांमध्ये असलेले व्हिटॅमिन ए डोळ्यांची दृष्टी सुधारते. अंडी खाल्ल्यानं पचनक्रिया तर सुधारतेच त्याचबरोबर शरीराला ऊर्जाही मिळते. रोगप्रतिकारशक्ती वाढवते. डॉ. शुभांगी तम्मलवार यांच्या मते जे लोक दिवसातून एक किंवा दोन उकडलेली अंडी खातात त्यांच्या रक्तातील कोलेस्टेरॉलच्या पातळीत निरोगी बदल जाणवतात. असं असलं तरीही दररोज उकडलेली अंडी खाल्ल्यानी काही लोकांमध्ये दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.
- अंडी खाण्याचे साइड इफेक्ट्स
- ऍलर्जी: दररोज उकडलेली अंडी खाल्ल्यानं काही लोकांना ऍलर्जी होऊ शकते. शिवाय ज्या लोकांना त्वचेवर पुरळ उठणं, लालसरपणा यांसारख्या समस्या आहेत, त्यांनी काही दिवस अंडी न खाणं चांगलं असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
- हृदयविकार :ज्या लोकांच्या शरीरात कोलेस्टेरॉलचं प्रमाण जास्त असतं, त्यांनी रोज अंडी खाल्ल्यास कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका असतो. यामुळे हृदयविकार होण्याची शक्यता असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे.