Activity Increase Life Expectancy:तुम्ही नियमित अडीच तास चालता का? जे लोक दररोज अडीच तासांपेक्षा जास्त चालतात त्यांना जुनाट आजार होण्याचा धोका कमी होतो. तसंच त्यांचं आयुर्मान आणखी 11 वर्षांनी वाढू शकते, असं ब्रिटीश जर्नल ऑफ स्पोर्ट मेडिसिनने केलेल्या एका अहवालातून स्पष्ट झालं आहे. नॅशनल सेंटर फॉर हेल्थ स्टॅटिस्टिक्स, 2003-2006 नॅशनल हेल्थ अँड न्यूट्रिशनल एक्झामिनेशन सर्व्हे, यूएसए 2019 च्या जनगणनेचा डेटा वापरून हा अभ्यास करण्यात आला.
काय आहे संशोधन?40 वर्षापेक्षा जास्त वयाच्या 25 टक्के अमेरिकन लोकांवर हा अभ्यास करण्यात आला. यात असं आढळून आलं की, जे लोक शारीरिकरित्या जास्त सक्रिय असतात ते सुमारे पाच वर्षे जास्त जगू शकतात. यामुळे या अभ्यासानुसार असा अंदाज लावण्यात आला की, जे लोक नियमित अडीच किलोमिटर पेक्षा जास्त चालतात त्यांचं आयुर्मान इतरांच्या तुलनेत 11 वर्षे वाढते. संशोधकांचं म्हणणं आहे की, जे लोक कमी शारीरिक हालचाली करतात त्यांना हृदविकार आणि अकाली मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते.