Simple Way Reduce Stress In Women:कौटुंबिक जबाबदाऱ्या, ऑफिस आणि घरकामामुळं महिलांचं मानसिक आरोग्य दिवसेंदिवस बिघडत चाललं आहे. कामाच्या व्यापामुळे महिला स्वतःच्या आरोग्यकडं सर्रास दुर्लक्ष करतात. यामुळे बऱ्याच महिला डिप्रेशनच्या आहारी जात आहेत. सतत विचारांचा कल्लोळ मनामध्ये गोंधळ निर्माण करतो. ज्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण दिलं जातं. त्याचा थेट परिणाम आरोग्यसह कुटुंबावर देखील होतो. अशा परिस्थितीत नेमकं काय करावं हे समजत नाही. चला तर जाणून घेऊया दिवसभराचा हा स्ट्रेस कसा कमी करावा.
- नियमित मेडीटेशन करा :रोज न चुकता मेडीटेशन केल्यास तुम्ही शांत आणि निरोगी राहू शकता. मानसिक ताणतणावापासून दूर राहायचं असेल तर नियमित मेडीटेशन करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. ध्यानधारणा आणि योगासनांमुळे आपल्याला मानसिक शांती मिळते.
- छंद जोपासा : नियमित अर्धा तास किंवा आठवड्यातील एक दिवस तरी आपल्या छंदासाठी राखीव ठेवा. यामुळं तुम्ही आनंदी राहू शकता. तुम्ही ज्या कामात कुशल आहात ते करा. जर लिहायला आवडत असेल तर रोज आपल्या भावना लिहत चला. यामुळं ताण कमी होतो शिवाय तुम्ही रिफ्रेश देखील व्हाल.
- दहा मिनिटं गाणी ऐका किंवा डान्स करा : आपल्या बहुतांश समस्या सोडवणारी एक गोष्ट म्हणजे डान्स करणं होय. नियमित डान्स केल्यास दिवसभराचा स्ट्रेस निघून जातो. यामुळे मानसिक आरोग्यासोबतच शारीरिक आरोग्य देखील सुधारतं. वजन कमी करण्यासाठी आणि हृदयाचं आरोग्य सुधारण्यासाठी डान्स महत्त्वाची भूमिका बजावते.
- नाही म्हणायला शिका :समोरच्या व्यक्तीला राग येईल म्हणून आपण आपल्या मागे नको असलेले काम लावून घेतो. परंतु, आपली नाही न म्हणण्याची सवय आपलं ताण वाढवते. त्यामुळे सर्वात आधी नाही म्हणणे शिका.
- कुटुंब, मित्र- मैत्रिणींशी गप्पा करा : शक्य असल्यास ऑफिसचं ताण ऑफिसमध्ये विसरून घरी परता. यामुळे तुमची कौंटुंबिक बॉन्डिग चांगली होईल. अनेकदा आपण कामाचा ताण कुटुंबियांवर काढतो. त्यामुळे आपलं कुटुंब न कळत दुखावल्या जाते. तुम्ही आपल्या प्रिय व्यक्तीसोबत काही काळ घालवा. यामुळे तुम्ही शांत राहाल. ऑफसच्या ताणावाव्यतीरिक्त त्यांच्याशी दुसऱ्या विषयांवर बोला.
संदर्भ