महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / health-and-lifestyle

लग्नाआधी प्रत्येक जोडप्यानं अवश्य करा 'या' गोष्टींवर चर्चा अन्यथा होईल पश्चाताप - DO THESE THINGS BEFORE MARRIAGE

लग्नानंतर प्रत्येकाच्या जीवनात नव-नवीन बदल होतात. परंतु, काही लोक हे बदल स्वीकारण्यास तयार नसतात. परिणामी त्यांच्या आयुष्यत अनेक अडचणी येतात.

Do These Things Before Marriage
लग्नाआधी प्रत्येकांनी करा यावर चर्चा (ETV Bharat)

By ETV Bharat Lifestyle Team

Published : Nov 28, 2024, 5:27 PM IST

Do These Things Before Marriage: लग्नानंतर मुला-मुलींच्या आयुष्यात अनेक बदल होतात. लग्नबंधनात अडकलं की, प्राथमिकता आणि जबाबदाऱ्या आपोआप बदलतात. परंतु कधी-कधी हे बदल स्वीकार करण्यासाठी आपलं मन तयार नसतं. यामुळे तुमचं मन अस्वस्थ व्हायला लागतं. अशावेळी दोघांनीही एकमेकांना समजून घेतल्यास काहीप्रमाणात प्रॉब्लेमस दूर होऊ शकतात. कारण, वयानुसार काही जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतात आणि त्या आपण स्वीकारल्या नाही तर नात्यातील गोडवा कमी होवू शकतो. परंतु, या जबाबदाऱ्या सकारात्मक पद्धतीनं हाताळल्यास तुमचं आयुष्यात आनंद दरवळू शकते. परंतु या गोष्टीसाठी दोघेही तयार असलं पाहिजे.

  • लग्नापूर्वी जोडीदाराशी गप्पा करा:लग्नाआधी कोणतेही वाद होवू नये म्हणून बऱ्याच मुली लग्नाआधी नवऱ्याशी कमी बोलतात. तसंच घरचे देखील मुला-मुलींना कमी बोलण्याचा सल्ला देतात. परंतु असं करू नका. लग्नाआधी जोडीदारांनी गप्पा मारणं आवश्यक आहे. कारण यामुळे दोघांनाही एकमेकांचा स्वभाव कळतो. तसंच आवडी-निवडींबद्दल देखील माहिती होते. यामुळे भविष्यातील वाद टाळता येवू शकतात. तसंच यामुळे नातं मजबूत होते. त्याचबरोबर गप्पा केल्यानं एकमेकांना अधिक जाणून घेण्यात मदत होते.
  • मित्र- मैत्रिणींशी नातं कायम ठेवा:लग्नाआधी तुमचे काही खास मित्र किंवा मैत्रिण असतात. ज्यांच्या जवळ आपल्या आयुष्यातील सर्व गोष्टी शेअर करतो. परंतु, लग्नानंतर आपण त्यांच्याशी जास्त प्रमाणात बोलत नाही. मात्र, असं करू नका. लग्नापूर्वी आणि लग्नानंतर देखील मित्र-मैत्रिणींशी गप्पा करा. त्यांना जीवनातील चढ-उतार किंवा सुख-दुख सांगितल्यास अनेक समस्या दूर होतात. कारण मित्र परिवारांसारखी भक्कम सपोर्ट सिस्टीम कोठेच नाही.
  • मनातील प्रश्नांवर चर्चा करा:लग्नापूर्वी प्रत्येक जोडीदाराच्या मनात एक ना अनेक प्रश्न असतात. ते कोणत्याही गोष्टींशी संबंधित राहू शकतात. जसे की, जॉब, आवड-निवड, ड्रेसिंग, सोबतच इतर अनेक प्रश्न असू शकतात. जर हे प्रश्न आपण विचारले नाहीत तर मनात कायम अस्वस्थता निर्माण होवू शकते. त्यामुळे मनात आलेल्या प्रत्येक प्रश्नांवर चर्चा करा. यामुळे नातं आणखी घट्ट होते.
  • भांडण करा: लग्नाआधी प्रत्येक जोडप्यानं हेल्दी भांडण करा. कारण यामुळे तुमच्या जोडीदाराच्या अडचणी किवा जोडीदार भांडल्यास त्यांना कसं हाताळावं हे कळते. ही यशस्वी वैवाहिक जीवनाची गुरुकिल्ली आहे. कारण भिन्न विचारसरणीमुळे एखाद्या मुद्यावर गैरसमज होण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी जोडीदाराला कसं समजवून सांगावं याची माहिती होते.

ABOUT THE AUTHOR

...view details