महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / health-and-lifestyle

होळीचा मनसोक्त रंग उधळताना घ्या 'ही' आरोग्याची काळजी: नाहीतर धरावा लागेल रुग्णालयाचा रस्ता - Holi Festival 2024 - HOLI FESTIVAL 2024

Holi Festival 2024 : होळीचा सण साजरा करण्यासाठी तरुणाईचा उत्साह शिगेला पोहोचतो. मात्र होळीचे रंग खेळताना आवश्यक ती काळजी घ्यावी लागते. नाहीतर रंगाचा बेरंग होण्याची शक्यता जास्त असते.

Holi Festival 2024
संग्रहित छायाचित्र

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 25, 2024, 10:03 AM IST

हैदराबाद Holi Festival 2024 : होळीच्या रंगांसोबत करंजी, चाट-पकोडे, थंडाई चाखली नाही, तर होळीचा उत्सव अपूर्णच वाटतो. पण होळीच्या दिवशी जर या चविष्ट पदार्थाचा खूप मोठ्या प्रमाणात आस्वाद घेतला, तर होळीनंतर अनेकदा डॉक्टरांकडं जावं लागते. त्यामुळे होळी खेळताना आणि होळीनंतर काही सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. नाहीतर होळीचा रंग बेरंग होण्याची शक्यता जास्त आहे.

संग्रहित छायाचित्र

रेडीमेड पदार्थांमुळे होते नुकसान :भारतातील विविध भागात आजही होळी खेळण्याची परंपरा सारखीच आहे. होळीच्या दिवशी मनसोक्त रंग उधळण्यात येतात. पूर्वी होळीच्या सणाच्या अगोदर घरात तीन चार दिवस अगोदरच मोठी तयारी सुरू होत असायची. यात करंजी, खारट गोड पदार्थ, चाट, पापडी आदी बनवले जायचे. मात्र आता धकाधकीच्या जीवनात वेळ नसल्यानं ही पदार्थ बनवण्यात येत नाहीत. तर होळीच्या सणाच्या अगोदर ते सगळे पदार्थ रेडीमेड घेण्यावर नागरिकांचा कल आहे. मात्र या रेडीमेड पदार्थांमुळे आरोग्यावर विपरित परिणाम होतात.

संग्रहित छायाचित्र

रसायनयुक्त रंगांचा वापर :होळीचा सण साजरा करताना नागरिक मोठ्या प्रमाणात रंगाचा वापर करतात. यात अगोदर नैसर्गिक रंगाचा वापर होळी खेळण्यात करण्यात येत होता. आता मात्र होळी खेळताना रसायनयुक्त रंगाचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे रसायनयुक्त रंगाचा वापर केल्यास त्वचेवर विपरित परिणाम होण्याची शक्यता जास्त असते. कोणाला रसायनयुक्त रंगाची अॅलर्जी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे डॉक्टरांकडं जाऊन उपचार करण्याची गरज निर्माण होते. म्हणून होळी खेळताना शक्यतो नैसर्गिक रंगाचा वापर करा.

संग्रहित छायाचित्र

होळी खेळताना घ्या काळजी :"पूर्वीच्या काळी होळीचे रंग घरीच बनवले जात होते. त्यासह वेगवेगळे खाद्यपदार्थही घरीचं बनवण्यात येत असत. आता मात्र होळीच्या सणाला रेडीमेड खाद्यपदार्थ मागवण्यात येतात. त्यामध्ये हानिकारक पदार्थ, खराब तेल, जास्त मीठ मसाल्याचा वापर करण्यात येतो. त्यामुळे या रेडीमेड खाद्यपदार्थांचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. त्यामुळे घरी बनवलेल्या विविध प्रकारच्या थंड पेयाचा वापर जास्त करण्यात यावा," अशी माहिती भोपाळ इथले डॉक्टर राजेश शर्मा यांनी दिली.

संग्रहित छायाचित्र

हेही वाचा :

  1. उजाड माळरानात बहरला केशरी, पिवळा पळस; 'ही' आहेत महत्त्वपूर्ण औषधी गुणधर्म - Holi Festival 2024
  2. होळीच्या दिवशी तब्बल 100 वर्षांनंतर चंद्रग्रहणाचा योगायोग; हे ग्रहण कधी दिसणार? - Lunar Eclipse 2024
  3. प्रसिद्ध सैलानी बाबा यात्रेला सुरुवात; होळीनिमित्तानं लाखो भाविकांची मांदियाळी - Sailani Baba Festival

ABOUT THE AUTHOR

...view details